बन्सी महाराज मिठाई आणि जोशी परिवाराच्या वतीने हनुमान चालिसा पठणाचे रविवारी आयोजन

बन्सी महाराज मिठाई आणि जोशी परिवाराच्या वतीने हनुमान चालिसा पठणाचे रविवारी आयोजन 

वेब टीम नगर : बन्सी महाराज मिठाई आणि जोशी परिवार मित्र मंडळाच्या वतीनं येत्या रविवारी दिनांक १३ रोजी रात्री ८ वाजता डाळमंडई येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

सालाबाद प्रमाणे याही वर्षी सव्वालक्ष हनुमान चालिसा पठण करण्यास ७ मार्च पासून सुरवात झाली असून हनुमान जयंती दिनी या उपक्रमाची सांगता होते. राजाभाऊ कोठारी , मंगल सेवा भक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या सुमधुर गायनातून हनुमान चालिसा पठण केले ज़ाते. बन्सी महाराज मिठाई , जोशी परिवार मित्र मंडळ च्या वतीने दर वर्षी  या कार्यक्रमाचं आयोजन केलं जात. २ वर्षांपूर्वी कोविडची साथ सुरु होण्या पूर्वी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. त्याही वेळी सुरक्षित अंतर राखून आणि उपस्थितांना मास्क वाटप करून हा कार्यक्रम करण्यात आला होता. 

यावर्षी कोविड चा प्रादुर्भाव अगदीच कमी झाला असल्याने मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे. बन्सी महाराज मिठाईचे हे शतकोत्तर वर्ष असल्याने मोठ्या धामधुमीत हा कार्यक्रम साजरा होणार असून भाविकांनी या हनुमान चाळीस पठणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा  असे आवाहन बन्सी महाराज मिठाई व जोशी परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.     

Post a Comment

0 Comments