जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम
गरोदर महीलांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आईसाहेब प्रतिष्ठान च्या वतीने आयोजन
वेब टीम नगर : जागतिक महिला दिनानिमित्त गरोदर महीलांसाठी मार्गदर्शन शिबीराचे आईसाहेब प्रतिष्ठानच्या वतीने उपनगर येथे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मार्गदर्शन करतांना प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. शिल्पाताई दुसुंगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले , "आजकाल आपण पाहत आहोत व ऐकत आहोत मूलींची जन्माची टक्केवारी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.ही खूप चिंतेची बाब आहे...महीलांनी आपल्या आरोग्या कडे चांगले लक्ष देण्याची काळाची गरज आहे.नियमित आहार व्यायाम या गोष्टी गरोदर महीलां साठी खूप महत्वाच्या आहेत. वेळोवेळी डाॅक्टरांचा सल्ला घेणे हे खूप महत्वाचं आहे.जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.या वेळी महीला डाॅक्टरांनी मार्गदर्शन केले.
या वेळी मेडिकल ऑफिसर डाॅक्टर माने मॅडम, फार्मसी ऑफिसर डाॅक्टर वैशाली, गवळी सिस्टर, चांदणे सिस्टर, पल्लवी सिस्टर, कावरे सिस्टर, दाताळ सिस्टर, बांगर सिस्टर, पवार सिस्टर, अटेंडंट शशी भाकरे तसेच परिसरातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
एकदिवस महिला वकिलांसोबत उपक्रम
वेब टीम नगर : जागतिक महिला दिना निमित्त आई साहेब प्रतिष्ठानच्या शिल्पा दुसुंगे यांनी न्यायालयात जाऊन एकदिवस महिला वकिलांसोबत हा उपक्रम राबविला या उपक्रमा अंतर्गत त्यांनी महिला वकील ज्या दिवसभर कोर्टात उपस्थित राहून आपल्या महिला अशिलांच्या अडीअडचणी सोडवितात ,त्यांची कामकारण्याची पद्धत त्यांना दिवसभरात येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या . आणि प्रत्येक महिला वकिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. आणि वकिलांची जीवनशैली समजावून घेतली . .
शिल्पा दुसुंगे यांनी महिला वकिलांची जीवनशैली समजावून घेतली त्यांना येणाऱ्या अडचणी समजावून घेतल्या आणि इतक्या कष्टातूनही महिला वकील त्यांच्या महिला अशीलांचे समुपदेशन करतात या गोष्टी समजावून घेतल्या. त्यांनी आज आमच्या कार्याची दखल घेऊन गुलाब पुष्प देऊन जो आमचा सत्कार केला तो आम्हाला कोरड्या शाब्दिक भावनांपेक्षा लाख मोलाचा वाटला अश्या भावना बार असोसिएशनच्या जनरल सेक्रेटरी ॲड . स्वाती नगरकर यांनी व्यक्त केल्या . या वेळी ॲड .गौरी नांदुरकर ,ॲड .गिरीजा गांधी ,ॲड .निशिता देशमुख ,ॲड .अनिता दिघे,ॲड . दीक्षा बनसोडे ,ॲड .सुनीता गोर्डे आदी उपस्थित होत्या . ॲड .अनिता दिघे यांनी शिल्पा दुसुंगे यांचे आभार मानले.
0 Comments