गँगस्टर इलियास बचकाना जेरबंद

गँगस्टर इलियास बचकाना जेरबंद 

 37 गुन्ह्यांची नोंद बंगळुरूमध्ये ठोकल्या  बेड्या 

वेब टीम बेंगळुरू : कुख्यात गँगस्टर इलियास अब्दुल अजीज खान ऊर्फ इलियास बचकाना याला  गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाने( सी आय यु) बेंगलुरु मधून अटक केली.  पुढील तपास पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  गेल्या एप्रिल मध्ये डॉक यार्ड कार्यालयात सर्फराज लुलाडिया (वय ३५) या व्यावसायिकावर बचकाना याच्या टोळीने हल्ला करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती.  त्याच्या मित्रांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे पोलिसांनी यातील आरोपी वाजिद शेख(वय ४०) याला अटक केली.  पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून करीम उर्फ शालू खान मोहम्मद शेख व या चौकडीला बेड्या ठोकल्या.  मोबीन शेख उर्फ मोबीन बाटला याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याचे समोर आले.  त्यामुळे भायखळा  पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला. 

 गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलिस निरीक्षक मिलिंद काठे यांना इलियास बचकाना  बेंगलुरु येथे लपल्याची माहिती मिळाली . पथकाने बंगलोरमधील हॉटेलमधून बचकाना याला अटक केली पोलीस अभिलेखावरील नामचिंन  गुन्हेगार असून त्याची स्वतःची एक टोळी आहे.  या टोळीची माध्यम  मुंबईत  प्रचंड दहशत आहे . त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न ,जबरी चोरी ,घरफोडी, तस्करी घातक शस्त्रांची विक्री करणे, आणि घातक शस्त्र बाळगणे, त्याचा गुन्ह्यात वापर करणे अशा 37 गुन्ह्यांची नोंद आहे. 

Post a Comment

0 Comments