पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; पाचजणांवर गुन्हा दाखल

पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; पाचजणांवर गुन्हा दाखल

वेब टीम राहुरी : राहुरी तालुक्यातील विवाहित तरुणीचा नाशिक येथे तिच्या सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात प्रतिक्षा राहुल मंडलिक हिच्या फिर्यादीवरून पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये आरोपी पती राहुल कैलास मंडलिक, सासू सुरेखा कैलास मंडलिक, सासरा कैलास दगूजी मंडलिक, नणंद ज्योती सुधीर सोनवणे, नंदई सुधीर सोनवणे सर्व रा. जेलरोड, नाशिक या पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक्षा राहुल मंडलिक राहणार जेलरोड, नाशिक. या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 25 ऑगस्ट 2021 ते 9 डिसेंबर 2021 या दरम्यान प्रतिक्षा मंडलिक ही विवाहित तरुणी तिच्या सासरी नाशिक येथे नांदत होती.त्यावेळी आरोपींनी औषधाचे दुकान टाकण्यासाठी प्रतिक्षा मंडलिक हिने माहेरहून आठ लाख रुपये आणावेत, या मागणीसाठी तिला त्रास दिला.तिला शिवीगाळ, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलीस ठाणे गाठून पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Post a Comment

0 Comments