निमित्त शिवजयंतीचे शिवरायांचे अष्ट प्रधान मंडळ आणि त्यांच्या मोहोरा : भाग २

 निमित्त शिवजयंतीचे  

शिवरायांचे अष्ट प्रधान मंडळ आणि त्यांच्या मोहोरा : भाग २

सन १६७६ मध्ये त्र्यंबकसुत मोरेश्वर हे मुख्य प्रधान मंत्री म्हणून नेमले गेले. त्यांच्या मोहरा खालील प्रमाणे 

१.इसवी सन १६७२

श्री शिवचरणी तत्पर त्र्यंबकसूत मोरेश्वर 

२.सन १६७६ 

श्री शिवराजेंद्र हर्ष निदान त्र्यंबक सूत्र मोरेश्वर मुख्य प्रधान 

३. सन १६८० 

एषा श्री शिवराजेंद्र मुख्य मातस्य सत्यदृक मुद्रा मोरेश्वरस्यास्तं भद्रासद्रांग दायिनी 

४.सन १६८३ श्री नीलकंठ मोरेश्वर पिंगळे यांची मुख्यप्रधान म्हणून नेमणूक केली गेली त्याप्रमाणे त्यांची मोहोर/शिक्का 

श्री शिवनरपती हर्ष निधान मोरेश्वर सूतनीलकंठ मुख्य प्रधान 

५. सन १६८५ मधील मुद्रा 

श्री शंभू  भंजनोत्कंठ  मोरेश्वर सूतनीलकंठ  

६.श्री शाहू महाराजांचे वेळेस श्री भैरव मोरेश्वर पिंगळे यांची मुख्यप्रधान पदी वर्णी लागली त्यांची मोहोर : 

श्री शाहू नरपती हर्षनिधान मोरेश्वरसूत भैरव मुख्यप्रधान 

७.करवीर निवासी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेळेला मुख्य प्रधान म्हणून श्री रतनसिंह जाधवराव मालेगावकर यांची नेमणूक करण्यात आली त्यांची मोहर :

श्री शंभोरमरसिंहस्य सुवर्णपदपंकजम यादवस्य कुलोत्तसौ रत्नसिंहो  विराजते

 आजच्या काळामध्ये शाळा-कॉलेज हायस्कूल या नोकरीच्या ठिकाणी किंवा एखाद्या गावाचा विकास करण्याविषयी एखाद्या विद्यार्थ्याने किंवा एखाद्या व्यक्तीने चांगले उत्कृष्ट काम केले तर त्या विद्यार्थ्याला,व्यक्तीला प्रोत्साहनात्मक काही बक्षीस किंवा पुरस्कार दिला जातो.ही पद्धत शिवकाळात सुद्धा लागू होती.  अशाच प्रकारचे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला शिवाजी महाराज यांनी वेगवेगळे किताब,पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला होता. काही व्यक्तींना तर जहागीरी, वतन ,कुलकर्णीपद, गावे, शेती बक्षीस दिल्याच्या नोंदी आढळतात. त्याप्रमाणे श्री शिवाजी महाराजांनी काही व्यक्तीस दिलेले किताबांची यादी खाली देत आहे. 

१.निंबाळकर यांना "सरलष्कर" हा किताब दिला होता. 

२.नागपूरचे भोसले यांना "सेनासाहेब सुभा" या किताबाने गौरविण्यात आले होते.  

३.दाभाडे यांना  "सेनाधुरंदर" हा किताब दिला होता.  

४.  आढोळे यांना "समशेरबहाद्दर" या किताबाने त्यांची पाठ थोपटली होती.  

५. देवासचे पवार यांना "विश्वासराव" हा किताब दिला होता. 

६. महादजी नाईक यांना "पानसंबळ" हा किताब दिला होता. 

७.  थोरात यांना  "दिनकरराव" या किताबाने उपकृत केले होते. 

८.शिंदे यांना "समशेरबहाद्दर" हा किताब दिला होता. 

९.धनाजी जाधव यांना "जयसिंगराव" या किताबाने गौरवण्यात आले होते. 

१०. संताजी घोरपडे यांना हिंदूराव - मयलकतमदार हा किताब दिला होता. 

11.अमिर-उल यांना "उमराव" हा किताब होता. 

12. मदार-उल्मुल्क  

१३. सेना जंग बहादुर. 

 14 फत्तेजंग 

15 सरफन उल्मुल्क  

इत्यादी किताब देऊन गौरविण्यात येत होते. या अशा उत्कृष्ट कामगिरीमुळेच शिवाजी महाराजांनी हिंदुस्तान मध्ये पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण मराठा साम्राज्याचा झेंडा फडकावला होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. 

लेखक:  

नारायण आव्हाड 

मोडीलिपी वाचक 

अहमदनगर 

संपर्क : ९२७३८५८४५७ 

संदर्भ : संग्रहालय लायब्ररी, अहमदनगर

Post a Comment

0 Comments