सलूनमध्ये नंबर लावण्यावरून वाद ; मोठा तणाव
वेब टीम नगर : नगर शहरातील पीरशहा खुंट येथे कटिंगच्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणावरून किरकोळ वादातून मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान कोतवाली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
सदर ठिकाणी जमावाने वाहनांची तोडफोड केली याबाबत अधिक माहिती अशी कि, या ठिकाणी असलेल्या एका केशकर्तनालय च्या दुकानात नंबर लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली.
या बाचाबाचीचे रूपांतर मोठ्या भांडनात झाले असते दोन्ही बाजूंनी तरुणांचा मोठा जमाव जमल्याने या ठिकाणी वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मात्र या घटनेची खबर कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना कळताच यांनी तातडीने येथे धाव घेत सर्व जमावाला पांगवले याठिकाणी
एक गाडी फोडण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही दरम्यान सदर ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
0 Comments