भैय्यूमहाराजाच्या तीन शिष्याना 6 वर्षांचा तुरुंगवास
मुलगी कुहूचे मौन म्हणाली संधी आल्यावर बोलेन
वेब टीम इंदोर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी ३ वर्षांनंतर निर्णय आला आहे. इंदूर जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भैय्यू महाराजांचे शिष्य पलक, मुख्य सेवेदार विनायक, चालक शरद यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी आरोपींच्या वकिलांनीही सेवादार विनायक यांच्या जामीनाबाबत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. इकडे मुलगी कुहूने या निर्णयावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तिने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले कि, आता काहीही बोलणार नाही. संधी आल्यावर मी नक्की बोलेन, तुम्हाला कळेल.
विनायकच्या जामिनासाठी आरोपीचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जिथे सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 6 महिन्यांत संपवण्याचे सांगितले होते, पण कोरोनामुळे सुप्रीम कोर्टाने पुन्हा 6 महिन्यांची मुदत दिली. या प्रकरणी 32 साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्यात आले. भय्यू महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, मुलगी कुहू आणि बहिणीसह डॉ. पवन राठी यांचेही जबाब घेण्यात आले आहेत.
तपासादरम्यान तत्कालीन सीएसपी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले होते की, पोलिसांना महाराजांकडून एक डायरी मिळाली होती, ज्यामध्ये महाराजांनी लिहिले होते की, मला जीवनात त्रास आहे, त्यामुळे मी जीवन सोडत आहे. या डायरीत त्यांनी आरोपी विनायकचे विश्वासपात्र म्हणून वर्णन केले होते. सीएसपी सुरेंद्र सिंह यांनीही या प्रकरणात तपासाअंतर्गत काही लोकांचे जबाब नोंदवल्याचे मान्य केले होते. यापैकी कोणालाही आरोपीवर संशय आला नाही. आत्महत्येच्या घटनेनंतर सहा महिन्यांनी पोलिसांनी विनायक, शरद आणि पलक यांना आरोपी म्हणून अटक केली. घटनेनंतर ६ महिने कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता .
बचाव पक्षाच्या साक्षीदारांनी जिल्हा न्यायालयात जबाब नोंदवला. ज्यात सेवेदार प्रवीणने न्यायालयासमोर सांगितले होते की, घटनेच्या 1 महिन्यापूर्वी भैय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र सेवेदाराने बंदूक लपवून ठेवली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पत्नी आयुषीने फोनवर बंदूक कुठे लपवली आहे याची माहिती घेतली. सेवादार प्रवीण घाडगे यांनी आयुषीला सांगितले होते की, महाराजांना बंदूक दिली तर ते काही चुकीचे पाऊल उचलू शकतात , मात्र महाराजांना शहराबाहेर जावे लागते असे आयुषीने सेवादाराला सांगितले. त्यांना बंदुकीची गरज आहे.असे त्या म्हणाल्या होत्या .
0 Comments