फिनेल पाजून विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न

फिनेल पाजून विवाहितेस जीवे मारण्याचा प्रयत्न 

वेब टीम नगर :  विवाहितेचे हात-पाय धरून सासरच्या लोकांनी तिला फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अहमदनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील जयभीम हौसिंग सोसायटीत ही घटना घडली.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती दिनेश गौतम मेढे, सासू अनिता गौतम मेढे, सासरे गौतम मेढे (सर्व रा. जयभीम हौसिंग सोसायटी, रेल्वे स्टेशन, अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

विवाहिता स्नेहा दिनेश मेढे (वय 25 रा. रेल्वेस्टेशनजवळ, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. स्नेहा यांचा दिनेश मेढे यांच्याशी विवाह झाला होता.

माहेरावरून पैसे आणि किंमती वस्तू आणण्यासाठी सासरी छळ सुरू करण्यात आला. स्नेहा यांचे सासू अनिता यांनी दोन्ही हात धरले तर सासरे गौतम यांनी पाय धरले पतीने बळजबरीने फिनेल पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या

जबाबावरून कोतवाली पोलिसांनी पती, सासू आणि सासरे अशा तिघांविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments