अनुराधा आदिक यांच्यावर गुन्हा दाखल करा
वेब टीम श्रीरामपूर : २६ जानेवारीला डॉ. बाबसाहेबांनी लिहलेल्या संविधानाच्या माध्यमातून सर्व देशवासियांना विचार स्वातंत्र्य आणि लिखाण स्वातंत्र्य मिळाले, मात्र ज्या संविधनामुळे जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली अशा श्रीरामपूर नगर पालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक यांनी,पालिकेत प्रशासक येताच पालिकेच्या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पाठ फिरवल्याचे लक्षात आल्याने, "माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा यांना पालिकेच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचा विसर पडल्या संदर्भात बातमी लावल्याचा राग अनावर झाल्याने"एका वृत्तपत्राचे संपादक असलेल्या स्वर्गीय खासदार गोविंदरावजी आदिक यांच्या कन्येने, तुम्ही पत्रकार आमच्या विरोधात पैसे घेऊन खोट्या बातम्या लावतात ? आम्हाला इतर कामे नाहीत का, पालिकेच्या ध्वजारोहणास जायला आम्ही रिकाम टेकडे आहे का ? अशा शब्दांचा वापर करून, जवळपास दिडशे ते दोनशे लोकांच्या जमवासमोर आरेरावीची भाषेत एस न्यूज मराठी,चौफेर कानोसा या प्रसार माध्यमांमध्ये व्यवस्थापकीय संपादक पदावर काम करत असलेल्या पत्रकारांसमोर सर्व पत्रकारांचा अपमान केल्याची निंदनीय घटना घडली.
या घटनेचा निषेध नोंदवित ग्रामीण पत्रकार महा संघाच्यावतीने,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर व उपविभागीय प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील श्रीरामपूर यांना निवेदन देऊन भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा अपमान करत पत्रकारांशी अरेरावी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून जर तत्कालीन राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल न झाल्यास संघटनेच्यावतीने विविध स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र उंडे यांनी दिला असून त्यामुळे निर्माण होणारी संभाव्य परिणाम व परिस्थितीस राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा गोविंदराव आदिक या वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार राहतील असेही जाहीर केले आहे.
या आंदोलनावेळी संघटनेचे राज्य संपर्कप्रमुख किरण शिंदे, साईकिरण टाइम्सचे राजेश बोरुडे, तिरंगा न्यूजचे अस्लम बिनसाद, एस ९ न्यूजचे युनूस इनामदार, स्वप्नील सोनार, लोकमतचे भरत थोरात, व्हिजन प्लसच्या सायरा सय्यद, एस न्यूज च्या मनीषा थोरात, अविनाश लिहणार, पत्रकार विठ्ठल गोरणे, आदी उपस्थित होते.
0 Comments