माहेरून पैसे आणावेत मागणीसाठी विवाहितेचा छळ

माहेरून पैसे आणावेत मागणीसाठी विवाहितेचा छळ

वेब टीम नगर : गाडी घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रूपये आणावेत म्हणून सासरच्या मंडळींनी शारीरिक व मानसिक छळ करत मारहाण केल्याची फिर्याद पीडित विवाहिता शेख यांनी पाथर्डी पोलिसात दाखल केली आहे.त्यावरून पोलिसांनी पतीसह सासू सासरा व नणंद अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल केलाआहे. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एकबाल मेहबुब शेख (रा.विक्रोळीपार्क घाटकोपर मुंबई ) यांच्याशी २०१० रोजी माझा विवाह झाला. पुढील काही वर्ष आमचा संसार सुरळीत सुरू राहिला, आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. 

त्यानंतर मात्र पती एकबाल मेहबूब शेख, इरफान महेबुब शेख, सना इरफान शेख, व ननंद शमीम अशीफ पठाण यांनी चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरुन पैसे आणावेत म्हणून मला घरात सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास दिला.अनेक वेळा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी शिवीगाळ करत मारहाण सुरूच ठेवली नंतर मी माझ्या भावाला बोलावून घेतले तो मला माहेरी घेवून आला.

मात्र त्यानंतरही तिसगावला येऊन सासरच्या लोकांनी तुला पैसे आणण्यासाठी पाठवले होते काय झाले पैशाचे म्हणून इथेपण त्रास दिला. 

कौटुंबिक समझोता व्हावा म्हणून अहमदनगर येथील भरोसा सेल तक्रार निवारण केंद्र यांच्याकडे आम्ही लेखी अर्ज केला परंतु सदर चौकशीकामी संबंधित लोक हजर न राहिल्याने व ते नांदवण्यास तयार नसल्याने या पीडित महिलेने दि.२१जानेवारी रोजी सासरच्या चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसात फिर्याद दाखल केली.

Post a Comment

0 Comments