सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले

सख्ख्या बहिणींना जीपने चिरडले 

वेब टीम पाटोदा :  जेवण करून दारापुढे अंगणात उभ्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना जीपने जोराची धडक दिली या अपघातात दोन्ही बहिणी  गंभीर रित्या जखमी होऊन ठार झाल्याची   घटना रविवारी रात्री साडेआठ वाजता तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली. 

 रोहिणी गाडेकर( वय  26), मोहिनी गाडेकर (वय 22) बहिणींची नावे आहेत.  रोहिणी ही नर्सिंगचे शिक्षण घेत होती  तर मोहिनी एका खासगी कंपनीत काम करत होती . या दोघी बहिणी आपल्या गावी धनगर जवळका येथे आल्या होत्या.  रात्री जेवण केल्यानंतर दारा समोर उभ्या राहिल्या असतानाच भरधाव वेगाने आलेल्या जीपने त्यांना जोराची धडक दिली.  या दोघी गंभीररीत्या जखमी होऊन ठार झाल्या. 

 दोघींना चिरडल्यानंतर जीपने पुढे एका दुचाकीला धडक दिली यात अजित मोरे व संतोष आगे हे जखमी झाले त्यानंतर चालकाने जीप सुसाट चालवून पळण्याचा प्रयत्न केला.  परंतु, नागरिकांनी त्याचा पाठलाग सुरू केला.  त्यानंतर जीप उभी करून त्याने पलायन केले पाटोदा पोलिसांनी जीप  ताब्यात घेत गुन्हा नोंदविला आहे.  सामान्य कुटुंबातील दोघा बहिणींनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेऊन पुढे गेल्या होत्या.  सुट्टीत गावी आल्यानंतर त्यांना एकाच वेळी अपघाती मृत्यू झाला.  जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर सोमवारी त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन केले.  अंत्यसंस्काराच्यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 
Post a Comment

0 Comments