पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाउंट झाले हॅक
ट्विटरची प्रतिक्रिया; म्हणाले, “यासंदर्भात माहिती मिळताच…”;
वेब टीम नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणावर ट्विटरकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट हॅक झाल्यानंतर ट्विटर इंडियाने एक निवेदन जारी केले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, “पीएम मोदींचे अकाऊंट हॅक झाल्याची माहिती मिळताच आम्ही लगेच सक्रिय झालो. आमच्या आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की आतापर्यंत इतर कोणत्याही अकाउंटवर परिणाम झाल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत.”
ट्विटरच्या प्रवक्त्याने सांगितले की, “आम्ही पंतप्रधान कार्यालयाशी संवाद साधण्यासाठी २४X७ उपलब्ध आहोत. आम्हाला या हॅकिंग अॅक्टिव्हिटीची जाणीव होताच, आमच्या टीमने त्यांचे अकाउंट सुरक्षित करण्यासाठी तातडीने आवश्यक पावले उचलली.”
पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करत यासंबंधी माहिती दिली आहे. “‘पंतप्रधानांचं ट्विटर हँडल @narendramodi सोबत छे़डछाड करण्यात आली होती. ट्विटरला याची माहिती देण्यात आली असून अकाऊंट तात्काळ पुन्हा सुरक्षित करण्यात आलं आहे. छेडछाड करण्यात आलेल्या काळात करण्यात आलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करा,” असं पंतप्रधान कार्यालयाने सांगितलं आहे.
0 Comments