२ हजारांच्या नोटांची संख्या निम्याने घटली !

२ हजारांच्या नोटांची संख्या निम्याने घटली !

वेब टीम नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत २,००० रुपयांच्या चलनी नोटांची संख्या निम्म्याने घटली असून सध्या केवळ २२३.३ कोटींच्या (१.७५ टक्के) नोटा चलनात वापरल्या जात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत दिली आहे.

एका खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लिखित उत्तर दिले. यात ते म्हणतात की, देशात गेल्या नोव्हेंबर महिन्यात दोन हजारांच्या नोटांची संख्या २२३.३ कोटींपर्यंत कमी झाली आहे.सध्या प्रत्यक्ष चलनात असलेल्या या नोटांचे प्रमाण १.७५ टक्के एवढे आहे. परंतु, मार्च २०१८ मध्ये २,००० रुपयांच्या तब्बल ३३६.३ कोटींच्या (३.२७) नोटा बाजारपेठेत वापरल्या जात होत्या.

त्यानंतर हळूहळू या नोटांची संख्या घटत चालली आहे. देशात नोव्हेंबर २०१६ मध्ये विमुद्रीकरण (नोटाबंदी) झाल्यानंतर विशिष्ट प्रमाणात नोटा छापण्यात आल्या होत्या, असेही अर्थराज्यमंर्त्यांनी उत्तरात नमूद केले.दरम्यान, २०१८-१९ नंतर २,००० रुपयांच्या नव्या नोटा छापण्याचे आदेश जारी केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. देशात ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली होती, हे विशेष.

Post a Comment

0 Comments