तिने लिफ्ट मागितली आणि निर्जनस्थळी चालकालाच लुटले

तिने लिफ्ट मागितली आणि निर्जनस्थळी चालकालाच लुटले 

वेब टीम नगर :  रस्त्याने जात असताना  जर कोणी लिफ्ट मागितली तर आपण  त्या व्यक्तीस माणुसकीच्या भावनेने लिफ्ट देतो. परंतु काल एका कार चालकास माणुसकीच्या भावनेतून  मदत करणे चांगले च महागात पडले .

याबाबत समजलेली माहिती अशी कि काल दुपारच्या सुमारास नगरहुन जामखेड कडे जात असलेल्या वाहन चालक चांदणी चौकात आला असता चौकात उभे असलेल्या दोन कालेज युवक आणि एक महिलेस एस टी बस बंद असल्याने त्यांना मदत करण्याच्या भावनेतून वाहन चालकांने त्यांना गाडीत घेतले .

कॉलेजचे विद्यार्थी सारोळ्यात व महिला टाकळीस उतरणार असल्याचे सांगितले . त्या प्रमाणे कालेजचे ते दोन युवक सारोळ्याला उतरले व महिलेने टाकळी मध्ये टाकळीच्या माथ्यावर गाडी थांबवायला सांगितली . आपल्या पर्स मधुन पाचशे रुपये काढून तुमचे गाडीचे भाडे घ्या म्हणुन हुज्जत घालु लागली .

वाहन चालकाने पैसे घेण्यास नकार देत मी कुणाचे ही पैसे घेत नाही . बस बंद असल्याने मी आपणास येथे सोडले . परंतु महिला काही ऐकेना उलट कायद्याची भाषा करू लागली .मी तहसील कार्यालयात नोकरीस असून आमच्या मॅडमना बोलावून तुमच्यावर कारवाई करते अशी धमकी देऊन तुमच्या कडे किती पैसे आहेत ते द्या अशी मागणी करत त्याचाकडील रोख रक्कम घेऊन तेथुन पसार झाली . अनपेक्षीत झाल्या प्रकाराने वाहन चालक ही मुकाट्याने पश्चाताप करत मार्गस्थ झाला .

Post a Comment

0 Comments