इतिहासाच्या पाऊलखुणा : 'मलिक अंबर'

इतिहासाच्या पाऊलखुणा : 'मलिक अंबर'

साधारण  चौदाव्या-पंधराव्या शतकाच्या  सुरुवातीच्या  काळात येमेन  व बगदाद या शहरांमध्ये लहान मुलांची गुलाम म्हणून खरेदी विक्री केली जात होती.  यातील एक हबशी मुलगा इथिओपियातल्या 'चापू 'असे नाव धारण करणाऱ्या मुलाला पकडून त्याला अगोदर येमेनमध्ये गुलाम केले.  'गुलाम ' म्हणजे पडेल ते काम किंवा मालकाने सांगितलेले कोणत्याही प्रकारचे कामास नकार न देणे.  आणि नंतर त्यांची  गुलामाच्या बाजारातून विक्री करताना त्याला इस्लाम धर्माची दीक्षा दिली. 

१५७० सालीं  अहमदनगरच्या निजामाचा मंत्री चंगीझ खान यांच्याकडे 'अंबर' या नावाने त्याची विक्री केली व तो पहिल्यांदा हिंदुस्थानला आला.   चार-पाच वर्षे चंगीज  खानाबरोबर राहिल्यानंतर चंगीझ खानाचा सन १५७५ साली मृत्यू झाला.  त्यानंतर  अंबर हा मुक्त झाला.  नंतर विजापूरच्या आदिलशहाकडे काही दिवस राहिला त्या वेळेला तो आदिलशहाकडे सैन्यात भरती झाला.  थोड्याच दिवसात त्याला पदोन्नती देऊन तो सेनापति झाला.  त्याच वेळेला नेमके अहमदनगर शहर मोगलांनी घेतले होते ते निजामाला अंबरने सेनाधिकारी असतांना परत मिळवून दिले.  नंतर तो राज्याचा 'वजीर ' म्हणून काम पाहू लागला आणि खूप चांगल्या रीतीने शासन चालवू लागला.  

बादशहा शहाजहान याने अहमदनगर परत घेतल्या  नंतर अंबर ने  दौलताबाद जवळ खडकी हे गाव वसवून  तेथे अहमदनगरच्या निजामशहाच्या ची राजधानी वसविली.  याच  खडकी गावास  पुढे औरंगजेबाने औरंगाबाद हे नाव दिले आहे.  या ठिकाणी खूप सुधारणा केल्या विशेषता पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले.  खापरी नळाने पाणी आणून पिण्यासाठी हौद बांधले.  काही ठिकाणी कारंजी बांधली.   त्यातीलच एक प्रकार म्हणजे पाण्यावर चालणारी पिठाची चक्की तयार केली ती आजही 'पाणचक्की 'नावाने प्रसिद्ध आहे.   पर्यटकांना पाहण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.

  नंतर त्याने चांदबिबीचा  वजीर म्हणून अहमदनगर मध्ये ही खूप मोठे कार्य केले.  त्यातील ठळक कार्य म्हणजे मुगल व अहमदनगर निजामशाही यांच्यात भातोडी येथील झालेला रणसंग्राम तसेच अहमदनगर शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची केलेली खापरे नळाद्वारे सुविधा.  या प्रकारे नगर शहरासाठी त्याचे  खूप मोठे योगदान आहे.  व चांगल्या कार्यासाठी त्याला 'मलिक' हा किताब मिळाला.  मलिक अंबर म्हणून स्वकर्तुत्वाने नावारुपाला आला. 

लेखक : नारायणराव आव्हाड   

९२७३८५८४५७

संदर्भ- बखर हिंदुस्तानची

 लेखक -सुनीत पोतनीस ,आवृत्ती २०१८,पान नंबर १३९

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय लायब्ररी अहमदनगर, 

Post a Comment

0 Comments