सोशलसाईट वरून मैत्री करून महिलेला फसविले

सोशलसाईट वरून मैत्री करून महिलेला फसविले 

वेब टीम बीड : सोशल मीडिया साइटचा वापर करून अनेक जण आपल्या मित्रांशी  संपर्क साधत असतात तसेच नवीन  मित्र  देखील बनवतात. मात्र या मैत्रीचा कोण कसा वापर करतो याच काहीच नेम नसतो.  सध्या महिलांना सोशल मीडिया साइटचा वापर करून त्यांच्यावर अत्याचार तसेच त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. अशीच एक घटना राज्यातील बीड शहरात घडली आहे.

फेसबुक या सोशल मीडियावर एका ३५ वर्षीय विधवा महीलेची मैत्री एका तरुणाबरोबर झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. याचा फायदा घेत त्याने ३५ वर्षीय विधवा महिलेवर लग्नाचे आमिष  दाखवून वेळोवेळी बलात्कार केला आणि नंतर मोबाइल  बंद करून भेटणे टाळले.

या प्रकरणात पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडिता ही ३५ वर्षीय विधवा असून, ती बीड शहरामधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते वर्षभरापूर्वी फेसबुकवर तिची ओळख सम्राट गिते  (रा.परळी) याच्याशी झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात मैत्री झाली. ६ महिन्यांपासून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यामुळे त्यांच्या भेटीगाठी देखील सुरू झाले होते. मागच्या ६ महिन्यांत सम्राट गित्ते याने पीडितेवर विविध ठिकाणी नेवून बलात्कार केला आहे.

 दरम्यान पीडितेने लग्नाबाबत विचारले असता त्याने टाळाटाळ सुरू केली होती. शिवाय ४ दिवसांपासून मोबाइल बंद करून संपर्क देखील तोडला होता. दरम्यान या प्रकरणी बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आरोपी सम्राट गिते वर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनास्थळ हे बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा पिंपळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलिस करत आहे.

Post a Comment

0 Comments