डॉ.पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

 डॉ.पोखरणा, डॉ. ढाकणे यांना अटकपूर्व जामीन

वेब टीम नगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील अग्नीतांडवप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा आणि डॉ. सुरेश ढाकणे यांना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयास दि. 6 नोव्हेंबर रोजी अतिदक्षता विभागास आग लागून आतापर्यंत 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा आणि डॉ. ढाकणे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.

डॉ. पोखरणा यांनी करोनाच्या लाटेच्या वेळेस जिल्हा शासकीय रुग्णालयात तातडीने या कक्षाची उभारणी केल्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कक्षाचे बांधकाम झालेले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्रत्यक्ष या बांधकामाशी संबंध नाही. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असा युक्तीवाद त्यांच्याकडून करण्यात आला.

आग प्रतिबंधक उपकरणे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सकांची नाही, असा त्यांचा दावा आहे.

डॉ. सुरेश ढाकणे यांच्यावतीने दुर्घटनेवेळी ते गावी असल्याने प्रत्यक्ष आगीशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून दोघांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Post a Comment

0 Comments