बायोडिझेल विक्री रॅकेट… गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढली

बायोडिझेल विक्री रॅकेट…गुन्ह्याची व्याप्ती वाढली

वेब टीम नगर : कोतवाली पोलिसांनी केडगावात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 22 आरोपींचे नावे निष्पन्न झाली  आहेत 

त्यानंतर आता नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाटेफळ शिवारात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 17 आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान नगर शहरात बायोडिझेल विक्रीचे मोठे रॅकेट पुरवठा विभाग व पोलिसांनी समोर आणले आहे. याची व्याप्ती आता वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरूवातीला 11 जणांना अटक केली होती.

केडगाव बायोडिझेल प्रकरणात असलेला संजय साबळे याला वाटेफळ बायोडिझेल प्रकरणात वर्ग करून घेण्यात आले आहे. त्याला शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रस्त्याच्या बाजुला खुलेआम बायोडिझेल विकणार्‍या तस्करांवर नगर ग्रामीण पोलीस विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला होता.

नगर-सोलापूर रोडवरील वाटेफळ परिसरात ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

सुरूवातीला 11 जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपासादरम्यान आणखी 6 आरोपींचे नावे निष्पन्न झाली असून आरोपींची संख्या 17 झाली आहे. या गुन्ह्यात शिवसेनेचा शहर प्रमुख दिलीप सातपुते याचा देखील सहभाग आढळून आला आहे.

Post a Comment

0 Comments