छटपूजेला गेली असता..... मित्राने केला घात

छटपूजेला गेली असता..... मित्राने केला घात   

वेब टीम नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी ही माहिती दिली. पीडित तरुणी मंगळवारी आपल्या मित्रासोबत छठपूजेसाठी गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. गुरुवारी सकाळी वैद्यकीय चाचणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर थरथरी गाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला.

तक्रारदाराच्या एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तरूणी चंडी-समेरा राज्य महामार्ग ७८ जवळ आपल्या मित्रासोबत गेली होती. त्यावेळी चार जण तिथे आले आणि तिच्याशी गैरवर्तन करू लागले. विरोध केल्यानंतर आरोपींनी या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने चाकूचा धाक दाखवून तरुणीच्या मित्राला पकडून ठेवले आणि त्याला बेदम केली.

पीडितेच्या आईने केला तरुणावर आरोप

दरम्यान, पीडितेच्या आईने आपल्या मुलीविरोधात कट रचल्याचा आरोप त्या तरुणावर केला आहे. मंगळवारी संध्याकाळी तो तरूण मुलीला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर आपल्या मित्रांसोबत कट रचून तिच्यावर अत्याचार केले, असा आरोप तिच्या आईने केला आहे. कट आणि या गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप करत पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

वैद्यकीय तपासणीत अत्याचार झाल्याचे सिद्ध

एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही बुधवारी संध्याकाळी पीडितेची वैद्यकीय चाचणी केली. त्यात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments