सावत्र बापाने व त्याच्या मित्राने केले अल्पवयीनमुलीचे लैंगिक शोषण

सावत्र बापाने व त्याच्या मित्राने केले अल्पवयीनमुलीचे लैंगिक शोषण 


वेब टीम औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरमध्ये एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांनी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. महिन्याभरापासून नराधम आरोपी पीडित मुलीचे लैंगिक शोषण करत होते. या कृत्याला जन्मदात्या आईनेही विरोध केला नाही.

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर, वैजापूर पोलिसांनी सावत्र वडील राजू लक्ष्मण सोळसे, सतीश कनगरे आणि पीडित मुलीची आई अशी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी सावत्र बापाला अटक केली आहे. पण या गुन्ह्यातील आरोपी मित्र आणि पीडितेची आई फरार आहे. पोलिस या दोघांचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments