शाहरुख खानच्या मॅनेजरने केली पैशांची देवाणघेवाण? सी.सी.टीव्ही फुटेज आलं समोर
वेब टीम मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचं एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर येत आहे. ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागलं आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचं लोअर परळ मधील सीसीटीव्ही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागलं आहे. त्याप्रमाणे लोअर परळमध्ये ही डिल झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात किरण गोसावीने पूजा ददलानीला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र जर हे खरं असेल तर किरण गोसावीच्या विरोधात एसआयटी टीम खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोसावीवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची भांडाफोड प्रभाकर साईल याने आपल्या शपथपत्राच्या माध्यमातून केली होती.
किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यात डील झाल्याचा दावा पंच प्रभाकर साईलने केला होता. सॅम डिसोझा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये आर्थिक डीलविषयी ३ ऑक्टोबर रोजी भेट झाली होती, असंही पंच प्रभाकर साईलने सांगितलं होतं. साईलच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्या रात्री गोसावीला त्याच्या वाशी येथील घरी सोडले. त्यानंतर गोसावीने साईलला ताडदेवच्या एका हॉटेलच्या बाहेरुन पैसे आणायला सांगितले होते. त्या हॉटेलच्या बाहेर एक माणूस आला आणि त्याने २ बॅग साईलला दिल्या होत्या. जे साईलने ट्रायडेंट हॉटलमध्ये सॅम डिसोझाला दिले. मात्र ती रक्कम फक्त ३८ लाख होती असा साईलच्या शपथ पत्रात उल्लेख आहे. ह्या शपथ पत्रात साईलने उल्लेख केला आहे की गोसावी आणि इतर मध्ये २५ कोटींची डील झाली होती. त्यातून ८ कोटी समीर वानखेडे यांना दिले जाणार होते असा साईलने आपल्या पत्रात दावा केला आहे. मात्र सॅम डिसोझा जो ह्या प्रकरणात मध्यस्थी होता त्याने दावा केला आहे की, ददलानीकडून ५० लाख घेतले गेले होते. मात्र नंतर ती रक्कम परत केली गेली कारण गोसावी हा फसवणूक करत असल्याच्या समोर आला.
एक निळ्या रंगाची मर्सिडीज आणि दोन अन्य गाड्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्या आहेत. त्यात दोन गाड्या डिसोझा आणि गोसावी यांच्या असण्याची शक्यता आहे. एक महिला निळ्या मर्सिडीजमधून उतरताना, गोसावीशी बोलताना यात दिसते आणि नंतर दोघेही कारकडे परतत असल्याचे दिसते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोसावी, ददलानी, डिसोझा आणि यांच्यात भेट झाल्याचे दिसून येते अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस लवकरच पूजा ददलानी आणि आर्यन यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments