शरीफजीराजे स्मृतीदिन

 शरीफजीराजे स्मृतीदिन

 भातवडीचा रणसंग्राम

अहमदनगरच्या पुर्व बाजूस दोन कोसावर असलेल्या भातवडी या गावी 31 ऑक्टोबर सन १६२४ मध्ये दिल्लीचे मोगल व विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध अहमदनगरची निजामशाही यामध्ये खूप मोठा रणसंग्राम झाला.  यानिमित्ताने  भातवडीचे  इतिहास अभ्यासक किशोर कदम यांनी शरीफजीराजे भोसले यांच्या समाधी विषयी जागा शोधण्यापासून ते समाधीचे काम पूर्ण होईपर्यंत मागे वळून पाहिले नाही त्याचे फलित आज आपल्या डोळ्यासमोर आहे.

        भातवडीच्या लढाईत चे वर्णन जहांगिरा चे आत्मचरित्र 'तुझुक' मध्ये लढाईची माहिती आलेली आहे.  परंतु तो 'इकबालनामा'चा अनुवाद आहे.  या लढाईची माहिती कवी परमानंद यांचे 'शिव-भारत' आणि बाळाजी प्रभाकर मोडक यांचे विजापूरची आदिलशाही घराण्याचा  इतिहास व फुतूहात- ई- आदिलशाही या ग्रंथांमध्ये आलेली आहे. 

अहमदनगरच्या निजामशाहीचा खूप दिवसापासून मत्सर करणाऱ्या विजापूरचा आदिलशहा यांनी दिल्लीचे मोगल यांना खूप वेळा विनंतीवजा पत्रे दिली होती.  शेवटी दिल्लीचे बादशहांनी विजापूरच्या आदिलशहाची इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले आणि अत्यंत पराक्रमी असा मोगल बादशहा जहांगीर याने इब्राहीम आदिलशहा साठी सैन्य पाठवले.  निजामशाही विरुद्ध युद्ध करण्यासाठी जलालखान, सामत खान असे मुसलमान योद्धे व दादाजी विश्वनाथ ,राघव आचल, जसवंत व बहादूर जाधवांचे पुत्र ,लष्करखान सेनापतीस सह दिल्लीच्या बादशहाच्या आज्ञेने दक्षिणेत आले इकडच्या बाजूने म्हणजे आदिलशहाकडून मुस्तफाखान, मसुदखान, फरादखान ,दिलावरखान इत्यादी यवन व इतरही पुष्कळ सेनापती अतुलनीय असे पराक्रमी योद्धे आणि आदिलशाहीचे सरदार मुल्ला मोहम्मद च्या सांगण्यावरून आले.

अहमदनगरचे निजामशाही चे मलिकअंबर, सरदार लोक आणि शहाजीराजे भोसले, शरीफराजे भोसले, बलवान मल्हारराव, मंबाजी राजा ,नागोजीराव परसोजी , मुधोजी फलटणकर, बरेचशे सेनापती, जोहरखान, हमीदखान, आतसखान ,फतेहखान आणि दुसरेही मोठे सेनापती निजामशाहीचे संरक्षण करण्यासाठी आले होते.  नंतर उत्तरेकडून मोगलांचे व दक्षिणेकडून आदिलशहाचे सैन्य चालून आले . त्यांच्यावर निजामशाहीचे सैन्य व मलिकअंबर चालून गेले आणि भातवडी या गावी त्यांची भेट झाली . दौडणार्या घोड्यांचा आवाज त्यामुळे संपूर्ण आकाश धुळीने माखले गेले होते.  हत्तींचाचित्कार, विरांची सिंहगर्जना, धनुष्यबाणाचा आवाज ,वाऱ्याने फडफडणाऱ्या पताका, भाटांचा जयघोष यांनी आकाश दुमदुमून गेले होते.

माणसे, घोडे, हत्ती यांच्या रक्ताचे पाट वाहत होते . आणि थकल्यामुळे महानिद्रा घेतात असे वाटत होते.  नेम मारण्यात पटाईत असलेल्या विरां कडून स्वार मारले जात होते . घोडे क्रोधाने अत्यंत खवळून इतरत्र पळत होते.  यामध्ये काही माणसे मारले जात होती.  नंतर शहाजी व शरीफजी, मलिकअंबर चे  प्रिय  यवन   बाण , जंबे , तलवारी हातात घेऊन मोगलांच्या सैन्याची  खूप मोठी कत्तल केली ,ते घाबरून सैरावैरा पळू लागले नंतर त्रिशूल, धनुष्य, गदा ही शस्त्रे धारण करणाऱ्या शरीफजीस अडविले व त्याचा तीक्ष्ण बाणांनी शरीफजी घोड्यावरून खाली पडले ते खाली पडलेले शहाजीराजे यांनी पाहिले बंधू प्रेमापोटी मोगलांच्या सैन्यावर तुटून पडले त्यांचा पार धुव्वा उडवून दिला.  त्याच रात्री भातवडीचा तलाव फोडला आणि मोगलांचे सैन्य, रसद, घोडे, राहूट्या  या नदीच्या काठावर नदीमध्ये होत्या तर सर्व पाण्याच्या लोंढ्याने वाहून गेले व त्या ठिकाणी चिखल व दलदल झाली चालणे मुश्कील झाले आणि शेवटी मोगलांना व आदिलशहा यांना युद्ध थांबावे लागले.  आदिलशहास वाटत होते युद्धामुळे निजामशाही सत्ता कमी होईल परंतु उलट घडले आणखी वाढण्यास मदत झाली.  या प्रकारे भातवडीच्या लढाईत शहाजीराजे यांनी गनिमीकावा वापरून युद्धात विजय मिळवला, परंतु आपला धाकटाभाऊ शरीफजी राजे यांना या लढाईत वीरमरण आले.

लेखक : नारायण यशवंत आव्हाड,

 महाराष्ट्र शासन प्रमाणित मोडी लिपी वाचक,

 अहमदनगर

 मोबाईल नंबर 98 81 96 36 03

संदर्भ :  शिव-भारत कवी परमानंद यांचे मराठ्यांचा इतिहास,

 ग. ह. खरे व अ.रा.  कुलकर्णी

 वस्तू संग्रहालय, अहमदनगर

Post a Comment

0 Comments