'अग्नी ५' ची आज चाचणी, जगाचे भारताकडे लक्ष

'अग्नी ५' ची आज चाचणी, जगाचे भारताकडे लक्ष

वेब टीम बालाकोट : भारताच्या लष्करला बळ देणाऱ्या तसेच पाकिस्तान आणि चीनची झोप उडवणाऱ्या अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणजे इंटर कन्टिनेन्टर न्युक्लिअर मिसाईलची आज पहिल्यांदा युजर ट्रायल होणार आहे. ओडिशाच्या बालाकोट या ठिकाणावरुन ही चाचणी होणार आहे. या आधी अग्नी ५ या मिसाईलचे सात वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. पण यावेळी पहिल्यांदाच मल्टिपल टार्गेट पद्धतीने परीक्षण करण्यात येणार आहे. 

अग्नी ५ हे भारताचे इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल (ICBM) आहे. याची निर्मिती डीआरडीओने (DRDO) केली आहे. भारताने या मिसाईलच्या निर्मितीची सुरुवात २००८ साली केली होती. त्यानंतर आतापर्यंत याची सात वेळा परीक्षण घेण्यात आलं आहे. या मिसाईलच्या माध्यमातून न्युक्लियर वेपन्स कॅरी करता येऊ शकतात. हे मिसाईल सहजपणे वाहून नेता येऊ शकतं.

अग्नी ५ या मिसाईलचा वेग हा २४ मॅक इतका असून तो आवाजाच्या वेगाच्या २४ पट हा वेग असल्याचं सांगितलं जातं. अग्नी ५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राचा पल्ला हा पाच हजार किलोमीटर इतका आहे. आशिया, आफ्रिका आणि युरोपातील अनेक देश या मिसाईलच्या टप्प्यात येणार असल्याने भारताच्या लष्करी शक्तीत चांगलीच वाढ झाली आहे. बंगालच्या खाडीमध्ये बालासोर या ठिकाणी अग्नी५ चे परीक्षण करण्यात येणार असल्याने या भागातील सर्व विमानांच्या वाहतूकीवर बंदी आणण्यात आली आहे. 

एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना दुसरीकडे भारत अग्नी ५ चे परीक्षण करणार असल्याने चीनने या परीक्षणावर आक्षेप घेतला आहे. 


Post a Comment

0 Comments