"बिग बॉस"च्या घरात मीराने केले सुरेखाचे कौतुक

"बिग बॉस"च्या घरात मीराने केले सुरेखाचे कौतुक   

  वेब टीम मुंबई : छोट्या पडद्यावर गाजणारा कार्यक्रम 'बिग बॉस मराठी ३' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दणक्यात सुरू झालेल्या बिग बॉसने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. घरातील सदस्य आपापल्या परीने इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काहींची गट्टी जमली आहे. तर काहींचे वाद होत आहेत. अशात घरात गप्पा मारताना कलाकारांचे न ऐकलेले किस्सेदेखील प्रेक्षकांच्या कानी पडत आहेत. नुकताच मीरा जग्गनाथ हिने यापूर्वी सुरेखा कुडची यांसोबत काम केल्याचा खुलासा केला. तेव्हा सुरेखा यांनी मीराची बॅग सेटवरून फेकून दिल्याचं देखील तिने सांगितलं.

बिग बॉसच्या घरात गप्पा मारत बसली असताना मीराने सुरेखा यांच्यासोबतचा तिचा अनुभव सांगितला. मीरा म्हणाली की तिने यापूर्वी सुरेखा यांच्यासोबत काम केलं आहे. सुरेखा यांना आठवत नसल्याने मीराने उकल करत म्हटलं की, 'नकळत सारे घडले' या मालिकेमध्ये तिने सुरेखा यांच्यासोबत काम केलं आहे. या मालिकेतील मीराची भूमिका अगदी छोटीशी होती. सुरेखा यांच्या जावयाने अत्याचार केलेल्या मुलीची भूमिका मीराने साकारली होती. मात्र तेव्हा सेटवर मीरा आणि सुरेखा यांच्यात वाद झाल्याने सुरेखा यांनी रागात मीराची बॅग सेटवरून फेकून दिली होती.

रागाच्या भरात सुरेखा यांनी फेकलेली मीराची बॅग

या घटनेनंतर मीरा आणि सुरेखा यांचा कधीही संबंध आला नव्हता. त्यामुळे बिग बॉसच्या घरात सुरेखा यांना पाहिल्यावर मीरा घाबरली होती. सुरेखा घरातही तशाच वागणार अशी भीती मीराला वाटली होती. परंतु, आताचं सुरेखा यांचं वागणं पाहून मीरा चकित झाली आहे. त्या सुरेखा वेगळ्या होत्या आणि आता समोर असलेल्या सुरेखा वेगळ्या आहेत असं मीराचं म्हणणं आहे. मीराने हा किस्सा सांगत सुरेखा यांचं कौतुकही केलं.


Post a Comment

0 Comments