तुला माज आलाय का?
सविता बोठे यांनी आपल्या अंगरक्षकास धमकावल्याची रुणाल जरे यांची तक्रार
वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे यांच्या पत्नी सविता बाळ बोठे यांनी माझ्या अंगरक्षकाच्या एकेरी उल्लेख करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार जरे यांचा मुलगा रुणाल यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
कोर्ट कामकाजा करिता पारनेर येथे गेलो असता, रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे यांच्या पत्नीने ' तुला माज आलाय का कोणाच्या आदेशाने तू पोलीस ठाण्यात फिरतोस' अशी विचारणा करीत पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचे जरे यांनी निवेदनात नमूद केले.
जरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, अंगरक्षकाला दमबाजी करून बोठे मला धमकावण्याचा प्रयत्न करीत आहे . बोठे यांनी आरडाओरड सुरू केल्यानंतर अंगरक्षकाने पोलीस निरीक्षक यांच्या दालनात जाऊन त्यांच्याकडे बोठे यांच्या वर्तवणूकी विषयी माहिती दिली . सविता बोठे यांनी पोलीस निरीक्षक यांच्या दालनात येऊनही आरडाओरडा केला. बाळ बोठे सध्या कोठडीत आहे. तो कोणाच्याही मदतीने माझा काटा काढू शकतो याची मला कल्पना आहे. अंगरक्षक यांना धमकावून सविता बोटे माझ्या कुटुंबावर दडपण आणीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जरे यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
दरम्यान बोठे यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर उद्या (दि. २९ रोजी )सुनावणी होणार आहे.
0 Comments