लग्नाचे आमिष दाखवत परिचारिकेवर अत्याचार; अभियंत्यावर गुन्हा
वेब टीम नागपूर : लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे शारीरिक संबंध ठेवून त्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या अभियंत्यावर जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हितेश अशोकराव महाजन (वय २६) असे या अभियंत्याचे नाव असून, तो शासकीय सेवेत कार्यरत आहे. या प्रकरणातील २६वर्षीय तरुणी वर्धा जिल्ह्यातील एकाच गावातील रहिवासी आहे. त्यांची एकमेकांशी ओळख आहे. दोन वर्षांपूर्वी हितेश नागपुरात आला. काही दिवसांतच तो शासकीय सेवेत रुजू झाला. याच काळात ही तरुणीसुद्धा नागपुरात आली. ती परिचारिका आहे. या दोघांची पूर्वीची ओळख होतीच. त्याचे रूपांतर पुढे मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. दोघांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. लग्नाच्या आणाभाका झाल्या. शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. यातून तरुणी गर्भवती राहिली. तेव्हा, 'माझ्या बहिणीचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू', असे आश्वासन हितेशने दिले. या आश्वासनाच्या भरवशावर त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले, असा आरोप या तरुणीने केला आहे. पुढे त्याने व त्याच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. तरुणीने पोलिसांत तक्रार केली. तिच्या तक्रारीच्या आधारावर हितेशवर भादंविच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आलेत.
0 Comments