तालिबानच्या हल्ल्यात भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू

तालिबानच्या हल्ल्यात भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू

पुलित्झर पुरस्कार विजेते होते दानिश सिद्दीकी

रॉयटर्स या वृत्तसंस्थेसाठी करीत होते  छायावृत्तांकन 

वेब टीम काबूल : भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचा अफगाणिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये अफगाण सैन्यासोबत तालिबानविरोधी मोहीमेचे वृत्तांकन करत असताना झालेल्या चकमकीत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. दानिश सिद्दीक हे 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेचे दिल्ली ब्युरोतील मुख्य छायाचित्रकार होते. प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. भारतात करोना महासाथी दरम्यान त्यांनी काढलेल्या छायाचित्रांतून करोना संकटाची दाहकता जगासमोर आली होती.

अफगाणिस्तानमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानन आक्रमक भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तान सैन्य आणि तालिबानमध्ये दररोज चकमकी घडत आहेत. कंदाहार प्रांतातील स्पिन बोल्डाक जिल्ह्यात अफगाण सैन्यासोबत दानिश सिद्दीकी त्यांच्या वाहनातून जात होते. त्यावेळी तालिबानसोबत झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला. या चकमकीत काही अफगाण सैनिकही ठार झाले आहेत.

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेसाठी छायावृ्त्तांकन करण्यासाठी मागील काही दिवसांपासून दानिश सिद्दीकी अफगाणिस्तानमध्ये होते. आपल्या ट्विटर हॅण्डलवरून त्यांनी अफगाणिस्तानमधील घडामोडींचे काही फोटो, व्हिडिओ ट्विट केले होते. अफगाण सैन्याच्या वाहनातून जाताना सिद्दीकी असलेल्या वाहनावर हल्ला झाला होता.

पुलित्झर पुरस्काराने सन्मान

फिलिपिन्समधील वृत्तांकन आणि रोहिंग्यांचे स्थलांतर विषयांवर 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेला २०१८ चा पुलित्झर पुरस्कार मिळाला. म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या कारवाईनंतर त्यांनी बांगलेशात केलेल्या स्थलांतराची विदारक दृष्य रॉयटर्सच्या छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यात टिपून जगासमोर आणली होती. यात रॉयटर्सचे मुंबईतील छायाचित्रकार दानिश सिद्दीकी यांचे फोटो विशेष ठरले होते.

Post a Comment

0 Comments