खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब

खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब 

 वेबी टीम नगर : भाजपातून राष्ट्रवादीत आलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोटिंग समिती नेमली होती मात्र हा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे . 

खडसे यांच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे . गेल्या आठवड्यात खडसे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत.  फडणवीस सरकार मध्ये खडसे हे महसूल मंत्री असताना भोसरी येथे३. १ एकर भूखंड खडसे यांची पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यात आला होता.  एकतीस कोटी किमतीच्या या भूखंडाची निव्वळ ३. ७कोटींना विक्री झाल्याचा दावा केला गेला हा भूखंड अब्बास उकानी  यांच्या मालकीचा होता त्यांच्याकडून एमआयडीसीने १९७१ मध्ये अधिग्रहण केला होता परंतु उकानी  यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे फडणवीसांनी नेमलेल्या समितीचा अहवाल हा२०१७ मध्ये आला होता मात्र हा अहवाल समोर आणण्यात आला नाही एकनाथ खडसे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत हा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती.  जेणेकरून त्यांच्यावर असलेल्या आरोप खरे आहेत की खोटे हे जनतेला समजेल असे खडसे म्हणाले होते.  मात्र फडणविसांनी फक्त क्लिनचीट अहवाल निरर्थक असल्याचे सांगत सादर करणे टाळले होते. 

ईडीने एकनाथ खडसे यांच्यावर टोकाचे पाऊल उचलले यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अहवालाची विचारणा मंत्रालयाकडे केली तेव्हा मुख्य सचिवांनी हा अहवाल गहाळ झाल्याचे सांगितले आहे.  त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे यावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी झोटिंग समितीचा अहवाल जाणून-बुजून गायब करण्यात आल्याचा आरोप केला आहे.  तसेच विधानसभेत आवाज उठवण्याची दिवस गेले आता न्यायालयात जायचे की रस्ता रस्त्यावर उतरायचे  याचा निर्णय घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला . अहवालावर लाखो खर्च झोटींग समितीवर ४५  रुपये खर्च करण्यात आला होता तसेच एक वर्षाचा वेळ लागला होता या समितीसमोर खडसे हजर राहिले होते. 

Post a Comment

0 Comments