वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध

वाचन संस्कृती समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध 

महापौर रोहिणी शेंडगे : जिल्हा वाचनालयाच्यावतीने  सन्मान

    वेब टीम नगर : समाजाला व उगवत्या पिढीला वाचनाच्या माध्यमातून सुसंस्कृत करण्याचे कार्य महत्वपूर्ण असे आहे. नगरकरांना वाचन संस्कृतीने गेली दोन शतके समृद्ध करण्याचा जिल्हा वाचनालयाचा वारसा प्रेरक आहे. वाचनाची ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

     अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने नूतन महापौर शेंडगे यांचा अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महापौर शेंडगे बोलत होत्या. याप्रसंगी उपाध्यक्षा शिल्पा रसाळ, प्रा.ज्योती कुलकर्णी, संचालक दिलिप पांढरे, प्रा.मेधा काळे, कवी चंद्रकांत पालवे, गणेश अष्टेकर, ग्रंथपाल अमोल इथापे, नितीन भारताल उपस्थित होते.

     प्रा.मोडक यांनी प्रास्तविकात जिल्हा वाचनालय सातत्याने वाचनालयाच्या प्रगतीसाठी व वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करत असलेल्या उपक्रमबद्दल माहिती दिली.

     प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी बोलतांना जिल्हा वाचनालयाच्या जडण-घडणीत अनेकांचे योगदान लाभले आहे. भविष्यकाळात नूतन महापौर शेंडगे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा वाचनालय व सावेडी शाखेच्या प्रगतीसाठी व उपक्रमासाठी सक्रीय मदत मिळेल, असा आशावाद व्यक्त केला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा रसाळ, आभार प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी मानले. यावेळी वाचक, सभासद व ग्रंथपाल कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments