मोदी मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथ घेणाऱ्या त्रेचाळीस मंत्र्यांची यादी जाहीर

मोदी मंत्रिमंडळ विस्तारात आज शपथ घेणाऱ्या त्रेचाळीस मंत्र्यांची यादी जाहीर

महाराष्ट्राचे चार चेहरे 

वेब टीम नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा कॅबिनेट विस्तार अखेर दिल्लीत पार पडत आहे.  आज संध्याकाळी होणाऱ्या  शपथविधी समारंभात कॅबिनेट विस्तारामध्ये  ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.  कॅबिनेट विस्तारात दहा मंत्र्यांचे प्रमोशन करण्यात आले असून मंत्रिमंडळात ३३ नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कॅबिनेट च्या नव्या विस्तारात ओबीसी एसएससी एसटी समाजातील चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.  मोदींच्या नवीन कॅबिनेट मध्ये १२ मंत्री दलित समाजातील आहेत यात प्रत्येक मंत्री विविध एस सी समाजातील आहे . बारा मंत्र्यांपैकी दोन जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता आहे . सत्तावीस मंत्री ओबीसी समाजातील आहेत.  यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात.  यादव ,कुरमी, जाट , दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे.  ओबीसी समाजातील पाच मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं.  तर आठ मंत्री शेड्यूल ट्राईब समाजातील आहेत . पाच मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्यांक समाजातील आहे . यात मुस्लिम १, शीख १, बौद्ध २ आणि १ ख्रिश्चन धर्मातील आहे.  याशिवाय २९ ब्राम्हण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत.  त्यातील दोन महिलांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा दिला जाईल, नवीन मंत्रिमंडळ विस्तारात तेव्हा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे.  

५० वर्षांपेक्षा कमी असलेल्या१४ चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे.  यातील सहा जणांना कॅबिनेट मंत्री बनवले  जाईल कॅबिनेट विस्तारानंतर मोदी सरकार यांच्या मंत्रिमंडळाचं सरासरी वय ५८ राहणार आहे.  ४३मंत्र्यांच्या नावाची यादी पुढील प्रमाणे नारायण राणे, सर्वानंद सोनोवाल, वीरेंद्र कुमार ,ज्योतिरादित्य शिंदे, रामचंद्र प्रसाद सिंग ,अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार, पारस किरण रिजीजू , राजकुमार सिंह ,हरदीप सिंग पुरी, भूपेंद्र यादव ,पुरुषोत्तम रुपयाला ,अनुराग ठाकूर, पंकज चौधरी, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंग बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करांडलाजे ,भानु प्रताप सिंह वर्मा ,दर्शना विक्रम जरदोष ,मीनाक्षी लेखी ,अन्नपूर्णादेवी, नारायण स्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी एल वर्मा ,अजय कुमार चव्हाण, देवसिंग भगवंत खुबा, कपिल पाटील ,प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ.  भागवत कराड ,डॉराजकुमार सिंह, डॉ भारती पवार, विश्वेश्वर, शंतनू ठाकूर महेंद्र भाई, जॉन  बारला डॉ. एल मुरुगन, निश्चित प्रामाणिक त्रेचाळीस मंत्र्यांचा आज झालेल्या शपथ विधीमध्ये समावेश होता

Post a Comment

0 Comments