लसीकरण सुरू असतांना उपकेंद्र प्रमुखाची आत्महत्या

लसीकरण सुरू असतांना उपकेंद्र प्रमुखाची आत्महत्या 

वेब टीम पाथर्डी : तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असताना डॉक्टर गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली . ही आत्महत्या वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.  त्यामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून दोषींवर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

 पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉक्टर गणेश शेळके यांनी उपकेंद्राचे छताच्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली . शेळके ड्युटीवर आले ,त्यानंतर काही वेळाने त्यांना तिसगाव येथे बोलावण्यात आले होते.  त्यामुळे ते तिसगाव येथे गेले तेथून परत करंजी उपकेंद्रात आले असता ते तणावाखाली असल्याचे उपस्थित यांनी सांगितले.  यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांनी डॉक्टर शेळके यांना धीर देत घेऊ नका नोकरीमध्ये असे चालूच असते असे सांगत शेळके यांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.  मात्र ,त्यानंतर शेळके यांनी कागद व पेन जमा केला मी राजीनामा देणार असल्याचे सांगत दालनात गेले.  आतून दरवाजा लावून घेतला.  त्यानंतर दोन लसीकरण केल्यानंतर नर्सरी जेवणासाठी डॉक्टर शेळके यांना आवाज दिला, मात्र आतून आवाज येत नाही म्हणून दरवाजा वाजवला पण आतून कोणताही आवाज आला नाही म्हणून, फोन लावला तर फोन उचल फोन नाही उचलला नाही म्हणून सर्व नगरसेविकांनी खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला व खिडकीतून पाहिले तर शेळके यांनी छताच्या पंख्याच्या हुकला दोरी लावून गळफास घेतल्याचे दिसून आले. 

 डॉक्टर गणेश शेळके यांनी लिहिलेली सुसाईड नोट अशी,  मी डॉक्टर गणेश गोवर्धन शेळके आत्महत्या करत आहे.  यास कारणीभूत तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील तहसीलदार व कलेक्टर जबाबदार आहेत वेळेत पेमेंट न करणे ,कामाचा अतिरिक्त भार व पेमेंट कपातीची धमकी देणे या कारणास्तव मी आत्महत्या करत आहे, सही . 

सुसाइड नोट सापडली असून त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे असल्याने आरोग्य विभाग व प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.  डॉक्टर गणेश शेळके यांचे पार्थिव उच्च स्तरीय तपासणीसाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहे.  या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात येत असून पोलीस कॉन्स्टेबल सतीश कांबळे व अरविंद चव्हाण भाऊसाहेब तांबे व सपोनि कौशल्य निरंजन वाघ हे अधिक तपास करीत आहे. 

Post a Comment

0 Comments