भारताची दुसरी महिला अंतराळात घेणार भरारी

भारताची दुसरी महिला अंतराळात घेणार भरारी

सिरिषा बंडला ११ जुलै रोजी न्यू मॅक्सिकोमधून अंतराळात भरारी घेणार ; सिरिषासोबत इतर ५अंतराळयात्री आहेत

वेब टीम नवी दिल्ली : कल्पना चावलानंतर अंतराळात पाऊल ठेवणारी भारतीय वंशाची सिरिषा बंडला ही दुसरी महिला आहे. भारताकडून राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले व्यक्ती होते. यानंतर कल्पना चावला यांनी अंतराळात सफर केली. त्यावेळी भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्सनेही अवकाशात पाऊल ठेवले.  व्हर्जिन गॅलिक्टिकचा मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती रिचर्ज ब्रेनसन स्पेस वॉकसाठी जात आहेत. सिरिषा बंडला ११ जुलै रोजी न्यू मॅक्सिकोमधून अंतराळात भरारी घेणार आहे. दरम्यान सिरिषासोबत इतर ५ अंतराळयात्री आहेत. कल्पना चावला नंतर  सिरिषा ही दुसरी महिली आहे, जी अंतराळाच्या प्रवासाला जात आहे. 

सिरिषा बंडला ही चौथ्या क्रमांकाची अंतराळयात्री असून सिरिषा बंडलाचा जन्म आंध्र प्रदेशात झाला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील सिरिषा बंडला ही वयाच्या ४थ्या वर्षी आपल्या परिवारासह संयुक्त राष्ट्र अमेरिकेत स्थायिक झाली. सिरिषाचं हॉस्टनमध्ये लहानाची मोठी झाली. सिरिषा ही व्हर्जिन गॅलॅक्टिक येथे उपाध्यक्ष, शासकीय संबंध आणि संशोधक आहे. सिरिषाने अमेरिकेच्या पर्ड्यू युनिव्हर्सिटीमधून एरोनॉटिकल/एस्ट्रोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर  जॉर्जटाऊन विद्यापीठातून एमबीए केले आहे. २०१५ मध्ये सिरिषा व्हर्जिनमध्ये सहभागी झाली आहे. 

Post a Comment

0 Comments