मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण : बोगस लसीकरण करून लुटले ४ लाख २३ हजार रूपये

 मुंबईनंतर नवी मुंबईत बोगस लसीकरण : बोगस लसीकरण करून लुटले ४ लाख २३ हजार रूपये 

वेब टीम मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही बोगस लसीकरण झाले असल्याची घटना समोर आली असून दोन्ही घटनेतील आरोपी एकच आहेत. तुर्भे एमआयडीसी मध्ये असलेल्या ॲटोंबर टेक्नॉलॉजी कंपनीत एप्रिल महिन्यात ३५२ कामगारांचे लसीकरण करण्यात आले होते. मुख्य आरोपी डॉ मनीष त्रिपाठी याने केसीईपी हेल्थ केअरच्या नावाने कॅम्प घेत कंपनीतील सर्व कामगारांचे लसीकरण केले होते. यासाठी त्यांनी कंपनीकडून ४ लाख २४ हजार रूपये बिल आकारले. लसीकरणानंतर आरोपीने अनेक दिवस सर्टीफिकेट न दिल्याने कंपनी व्यवस्थापणाने याबाबत तगादा लावला होता. अखेर दोन कामगारांचे सर्टीफिकेट देत त्यावर लिलावती हॉस्पीटलचा उल्लेख असल्याने ॲंटोबर टेक्नोलॉजी कंपनी व्यवस्थापनाला यात काळेबेरे असल्याचा संशय आला. यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून तपास केला असता कामगारांचे केलेले लसीकरण बोगस असल्याचे तपासात समोर आले. आरोपी डाॅ मनीष त्रिपाटी, करीम आणि  साथीदार या तिघांवर विविध कलमांव्दारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन आरोपी मुंबई पोलीसांच्या कस्टडीमध्ये असून यातील तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.

Post a Comment

0 Comments