आजी-माजी सैनिकांकडून कोरोना सेंटरला ३१ हजारांची मदत

आजी-माजी सैनिकांकडून कोरोना सेंटरला ३१ हजारांची मदत

वेब टीम नगर : खातगाव टाकळी (ता.नगर) गावातील आजी-माजी सैनिकांनी भाळवणी (ता. पारनेर) येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांच्या उपचारासाठी ३१ हजार रुपयांची मदत आमदार नीलेश लंके यांच्याकडे सुपूर्द केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ खातगावातील अनेक ग्रामस्थांना सोसावी लागली होती. या लाटेत गावातील चार तरुणांचा मृत्यू झाला. अनेक जणांना बाधा झाली होती. आमदार नीलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये अनेक रुग्णांना दर्जेदार उपचार मिळाल्याने बरे झाले. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या सेंटरला मदत करण्याचा निर्णय गावातील आजी-माजी सैनिकांनी घेतला. भगवान कोल्हे, भाऊसाहेब सातपुते, राजाराम म्हस्के, संजय सातपुते, गणेश कुलट, संदीप कुलट यांनी ३१ हजार रुपयांचा धनादेश आमदार लंके यांच्याकडे सुपूर्द केला.

Post a Comment

0 Comments