ग्रामपंचायत सदस्यांवर गोळीबार,वाळूतस्करी की राजकीय वैमनस्यांतून हल्ल्याची चर्चा
तीन गोळ्या लागूनही सदस्य सुखरूप
वेब टीम नेवासे : तालुक्यातील बुर्हाणपुर ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री गोळीबार झाला. या गोळीबारात गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा गोळीबार वाळू तस्करीच्या वादातून झाला की राजकीय वैमनस्यातून झाला याविषयी तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
संकेत चव्हाण हे कांगुनी फाट्यावर बुर्हाणपुर रस्त्याने रात्री साडेनऊच्या दरम्यान घरी येत असताना एका ठिकाणी लघुशंकेसाठी थांबले होते . त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या इसमानी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून वाळूतस्करीच्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. हा कि पूर्ववैमनस्यातून याविषयी बुर्हाणपुर तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात आहेत. या गोळीबाराच्या घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल तातडीने घटनास्थळी हजर झाले बुर्हाणपूर परिसरात मोठा फौजफाटा दाखल झालेला आहे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान जवान यांना तातडीने नगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले तेथे डॉक्टर सतीश सोनवणे यांनी त्यांच्यावर उपचार केले. डॉक्टर सोनवणे यांनी चव्हाण यांची प्रकृती आता स्थिर आहे त्यांच्या शरीरातून तीन गोळ्या काढण्यात आल्या मात्र गोळ्या लागून गेल्या काही जन्मांच्या शरीरावर आहेत. काही गोळ्या हाडानाही चाटून गेल्या आहे. सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी चार तास लागले . रुग्ण वेळेत उपचारासाठी आला आणि उपचाराला साथ दिल्याने एवढा गोळ्या लागल्यानंतरही त्याचा जीव वाचला आहे असेही डॉक्टर सोनवणे यांनी सांगितले.
पंतप्रधानांना या तालुक्यातून जाणार ५० हजार पत्रं
वेब टीम नेवासे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने पंतप्रधानांना नेवासे तालुक्यातून 50000 पत्र पाठवल्याचे मनसेच्या विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष कमलेश नवले यांनी सांगितले . मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक पत्र मराठा समाजाच्या युवकांच्या उज्वल भविष्यासाठी असा संकल्प करण्यात आला आहे . त्यानुसार तालुक्यातून 50000 पत्र पाठवण्याचा मानस अध्यक्ष नवले यांनी केला आहे. त्यावेळी तालुकाध्यक्ष दिगंबर पवार शहराध्यक्ष गणेश गव्हाणे विद्यार्थी सेनेचे सचिव अविनाश गाढवे तालुका उपाध्यक्ष ऋषिकेश जंगम तालुका उपाध्यक्ष योगेश काळे विभाग अध्यक्ष रवींद्र पिंपळे तालुका संघटक तुषार शेळके मयुर नरोडे अक्षय बोधक पप्पू बोधक आप्पासाहेब आरगडे प्रतीक आरगडे विशाल तुपे चंद्रकांत आरगडे आदी उपस्थित होते.
0 Comments