अनलॉक होतांना नगर जिल्ह्यात बाधितांची संख्या आटोक्यात
वेब टीम नगर : आज कोरोनाबाधितांची संख्या साडे पाचशेच्या घरात पोहोचली असल्याने काहीसे दिलासादायक वातावरण आहे. शहरातील व्यवहार सुरळीत ठेवायचे असतील तर कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन नगर जिल्हा वासियांना करावे लागणार आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ५३० कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ३४, राहता- १८ ,श्रीरामपूर-३३, संगमनेर - ६८, नेवासे- ४९, नगर तालुका- १५ ,पाथर्डी - ३७ ,अकोले - १३, कोपरगाव - ०५,कर्जत - ३४, पारनेर -५८, राहुरी - १८, भिंगार शहर- ०१,शेवगाव - ६६, जामखेड - ४१, श्रीगोंदे - ३६, इतर जिल्ह्यातील - ०४, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.
0 Comments