आज जिल्ह्यात ३६१२ रुग्णांची नोंद

 आज जिल्ह्यात ३६१२ रुग्णांची नोंद 

शहरात आज लसीकरण झालेच नाही 

वेब टीम नगर :  जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्या कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा कमी झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येत एक हजाराची घट आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात ३६१२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. मात्र शहरात अपवाद वगळता कोणत्याही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील आयुर्वेद, तोफखाना, आदी लसीकरण केंद्रांवर लस शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले होते. ते फलक पाहून नागरिकांना रिकाम्या हाताने परततांना मनपाच्या नियोजन बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतांना दिसत होते.      

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ३६१२ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ४२८, राहता-२३५,श्रीरामपूर-२२९, संगमनेर- ४४२, नेवासे- २४१, नगर तालुका-२७४,पाथर्डी -१९३, अकोले -३६४, कोपरगाव -१४६,कर्जत -२२७, पारनेर -२५५, राहुरी -२६४, भिंगार शहर-५८ ,शेवगाव -३८, जामखेड -१३, श्रीगोंदे -१२२, इतर जिल्ह्यातील -६४, मिलिटरी हॉस्पिटल -१५ आणि इतर राज्यातील -०४ जणांचा समावेश आहे. 

शहरातील ऑक्सिजन पुरवठ्याची परिस्थिती सुधारली असली तरी ऑक्सिजनचा तुटवडा अजूनही सुरूच आहे.मात्र लवकरच जिल्ह्यात १३ नवीन ऑक्सिजन प्लांट सुरु होणार असल्याने हा तुटवडा कमी होईल.

Post a Comment

0 Comments