स्वातंत्रोत्तर काळात देशाला नेहरूंनी प्रगती कडे नेले : भुजबळ

स्वातंत्रोत्तर काळात देशाला नेहरूंनी प्रगती कडे नेले : भुजबळ 

वेब टीम नगर : स्वातंत्रोत्तरच्या काळाच्या प्रारंभी देश अविकसित होता तो प्रगतीकडे नेण्याचे काम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले म्हणून त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हंटले जाते असे प्रतिपादन शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले. 

अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची ५७ वि पुण्यतिथी टांगे गल्ली येथील संपर्क कार्यालयात सुरक्षिततेचे सर्व नियम पळून करण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्ष पदावरुन भुजबळ बोलत होते. यावेळी भिंगार काँग्रेसचे अनिल परदेशी, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर , शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, महिला काँग्रेसच्या रजनी ताठे , शहर चिटणीस मुकुंद लखापती आदी उपस्थित होते. 

स्वातंत्र्य पूर्व काळात पंडित नेहरू हे नगरच्या किल्ल्यात बंदिस्त होते. या घटनेची आठवण म्हणून भिंगार काँग्रेसचे स्व.अध्यक्ष  ॲड. आर आर पिल्ले यांनी पंडित नेहेरु यांची जयंती व पुण्यतिथी नगरच्या किल्ल्यात साजरी करत असत. किल्ला राष्ट्रीय स्मारक व्हावा हि मागणी त्यांनी उचलून धरली. तिचा पाठपुरावा या पुढेही आपण संघटित पणे करू असे यावेळी शाम वाघस्कर यांनी सांगितले. तर जेष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी म्हणाले पंडित नेहरु आणि मोतीलाल नेहरु यांचे देशकार्य वाखाणण्यासारखे होते. 

प्रारंभी भुजबळ याच्या हस्ते पंडित नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तर पदाधिकाऱ्यांनी नेहरूंच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले .       

Post a Comment

0 Comments