सुशीलकुमारच्या बायकोला दिल्ली पोलिसांची नोटीस

सुशीलकुमारच्या बायकोला दिल्ली पोलिसांची नोटीस 

वेब टीम नवी दिल्ली : सुशील कुमारला अटक करण्यात आली असली तरी त्याच्या बायकोला  दिल्ली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सुशील कुमारच्या बायकोचा या प्रकणात नेमका काय संबंध आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. पण ही गोष्टच या सर्व प्रकरणाचं मूळ कारण आहे, ही गोष्ट आता समोर आली आहे.

सुशील कुमार जेव्हा फरार झाला होता. तेव्हा त्याच्या नावाची नोटीस पोलिसांनी काढली नव्हता, तर त्याच्या पत्नीच्या नावाची नोटीस पोलिसांनी काढली होती. कारण दिल्लीतील मॉडेल टाऊनमधील घर हे सुशील कुमारच्या बायकोच्या नावावर आहे. हेच घर सुशील कुमार भाडेतत्वावर देत होता आणि या घरामध्येच मृत पावलेला युवा कुस्तीपटू सागरसह त्याचे मित्र राहत होते. या सर्व प्रकरणाचे मूळ कारण हे हे घर ठरले आहे. कारण हे घर सुशील कुमारला रिकामी करायचे होते. त्यासाठी तो सागरसह त्याच्या मित्रांशी बोलायला गेला होता. पण सागरचा मित्र सोनू आणि रवींद्र याने या गोष्टीला नकार दिला होता. त्यानंतर सोनूने सुशील कुमारची कॉलर पकडली होती आणि त्याला मारण्याची धमकीही दिली होती.

छत्रसाल स्टेडियम येथे ही सर्व घटना घडली होती. त्यावेळी सुशील कुमारला यावेळी राग अनावर झाला होता आणि त्याने बदला घेण्याचं ठरवलं होतं. यावेळी सुशील कुमारने कुख्यात गुंड नीरज बवाना गँगकडून सहारा घेतला आणि हरियाणावरुन काही लोकांना सोनूला मारहाण करण्यासाठी दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं होतं. ही सर्व लोकं ५-६ गाड्यांमधून आले होते. रात्री १२ वाजता हे सर्व जण रवींद्रच्या घरी जायला निघाले. पण त्यावेळी रवींद्र आपल्या इमारतीच्या खालीच उभा होता. रवींद्र आणि विकास या दोघांना या सर्वांना आपल्या गाडीत घेतलं आणि सर्व जण सुशील कुमारच्या मॉडल टाऊन येथील घरी पोहोचले. सुशीलच्या घरामधून सागर, सोनू, अमित आणि भक्तू यांना आपल्या गाडीत या लोकांनी बसवलं आणि त्यानंतर त्यांना छत्रसाल स्टेडियम येथे आणण्यात आलं. त्यानंतर सुशील कुमारच्य माणसांनी या सर्वांना जबर मारहाण केली. या सर्व गोष्टींमध्ये सागरचा जास्त संबंध नव्हता. पण तो सोनूचा मित्र असल्यामुळे त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एक जोरदार फटका सागरच्या डोक्यावर बसला आणि रक्तस्त्राव सुरु झाला. त्यामुळेच सागरचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनीही सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments