राहुरीत गतीमंद मुलीवर अत्याचार

राहुरीत गतीमंद मुलीवर अत्याचार  

वेब टीम राहुरी : राहुरी तालूक्यातील पुढाऱ्यांच्या दबावामुळे गतीमंद असलेल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची गंभीर घटना विनयभंग दाखवून रफादफा करण्यात आली. मात्र लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीच्या नातेवाईकांनी न्याय मिळविण्यासाठी राहुरी पोलिसात धाव घेतली आहे.

राहुरी तालूक्यातील बाभुळगांव येथे एक कुटुंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे. त्यांना एक १४ वर्षीय गतीमंद मुलगी आहे. दिनांक ३१ मार्च रोजी ती अल्पवयीन गतीमंद मुलगी तीच्या घरी एकटीच होती. दुपारी तीन वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील जेवण करण्यासाठी घरी गेले असता त्यांच्या गतीमंद मुलीवर विकास साहेबराव ससाणे हा तरूण लैंगिक अत्याचार करत होता. सदर घटना त्या मुलीच्या वडिलांनी समक्ष पाहिली. यावेळी त्यांनी राहुरी पोलिसात धाव घेऊन लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी बाभुळगांव येथील काही गाव पुढाऱ्यांनी सदर पिडीत कुटुंबावर दबाव टाकत गप्प केले. तसेच लैंगिक अत्याचार केलेला विकास साहेबराव ससाणे याचे त्या पिडीत मुलीशी लग्न लावून देतो अशी समजूत काढून लैंगिक अत्याचारासारखा गंभीर गुन्हा विनयभंग दाखवण्यात आला. असा आरोप पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

लग्न लावून देतो असे सांगितल्यानंतर लोकांनी दोन महिने घालवले. मात्र लग्न लावले नाही. आपल्या मुलीवर बलात्कार झाला तसेच आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर पिडीत मुलीच्या आई वडीलांनी आज दिनांक २६ मे रोजी राहुरी पोलिसात धाव घेऊन न्याय मागितला. एकतर आमच्या मुलीशी लग्न करा किंवा लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला शिक्षा द्या. अशी मागणी पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी केली आहे. आता या कुटुंबाला तसेच त्या अल्पवयीन गतीमंद मुलीला कोण न्याय देणार. याचीच चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Post a Comment

0 Comments