अश्लील फोटो इंस्टाग्राम वर प्रसारीत करुन जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद

अश्लील फोटो इंस्टाग्राम वर प्रसारीत करुन  जीवे मारण्याची धमकी देणारा आरोपी जेरबंद

वेब टीम नगर :  दि. १७/०५/२०२१ रोजी फिर्यादी मुलीने भिंगार कॅम्प पोलोस स्टेशन येथे फिर्याद दिलो को, रोहीत जालिंदर पाटोळे रा.फर्याबाग ,अहमदनगर याचे व  माझे एकमेकावर प्रेम होते , दरम्यानच्या काळात आम्ही दोघे बाहेर फिरायला गेल्यानंतर रोहीत पाटोळे याने त्याचे मोबाईल मध्ये आमचे दोघांचे काही खाजगी फोटो काढलेले होते.त्यानंतर आरोपी रोहित पाटोळे हा फिर्यादी मुलीस लग्नाची  मागणी घालु लागला.त्यास फिर्यादी मुलीने नकार दिला असता आरोपीने यांने फिर्यादी मुलीस व  तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी  देवु लागला.

 तसेच फिर्यादी मुलीचे नावाने इंस्टाग्रामवर बनावट अंकाऊट तयार करुन त्यावर त्यांचे मोबाईलमध्ये काढलेले खाजगी फोटो व व्होडीओ प्रसारीत करु लागल्याने फिर्यादी मुलीने भिंगार पोलीस स्टेशनला गु.रजि .न   १७८/२०२१ भादविक ३५४(ड),५०६(२).५०७ सह माहीती ;तंत्रज्ञान कायदा २०२० चे कलम ६६(अ),६६(ई) व ६७ प्रमाणे आरोपो रोहित पाटोळे यांचे विरुध्द गुन्हा दाखल केला  होता.सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी रोहित पाटोळे हा फरार झालेला होता. पोनि  अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गुप्त खबऱ्याकडून खात्रोशीर बातमी  मिळाली कि , सदर गुन्हयातोल आरापी  नाम रोहीत पाटोळे हा येरवडा,पुणे येथे राहत आहे. 

सदर बातमीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातोल पोहेकॉ. फकिरत शेख,पोहेकॉ/संदोप घोडके, पोना/रविवििरिण सोनट्टके ,पोकॉ . सागर सुलाने .पोकॉ .  रोहीत येमुल, .पोकॉ मयुर गायकवाड, ,पोकॉ मच्छिद्र बडे व यालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनो मिळुन येरवडा ,पुणे परीसरात आरोपोचा शोध घेवुन आरोपी नामे रोहीत जालींदर पाटोळे वय- २४ रा.फर्याबाग ,सोलापुर रोड,अहमदनगर यास गुन्हयात वापरलेल्यामोबाईलसह ताब्यात घेवून त्यास पुढील कारवाईकामी भिंगार कॅम्प पोलोस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे.

पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोस्टे करीत आहे.

, - सदर आरोपीवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहे.

 १) भिंगार कॅम्प २६८/२०१९ भाविक १४३,३२४,३२४,५०४,५०६

सदरची कारवाई मनोज पाटील , पोलीस अधिक्षक, अहमदनगर  सौरभकुमार अग्रवाल अपरपोलीस अधीक्षक, अहमदनगर, व  विशाल ढुमे, उपविभागीय पोलोस अधिकारी, नगर शहर विभाग,अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली  आहे. 

Post a Comment

0 Comments