रेखा जरे हत्या प्रकरण आणि जखणगाव हनीट्रॅप यांचा संबंध ?

रेखा जरे हत्या प्रकरण आणि जखणगाव हनीट्रॅप यांचा संबंध ?  

वेब टीम नगर : रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या पोलीस कोठडीत मोबाईल आढळून आल्याने बाळ बोठेची काळी कृत्य थांबता थांबत नाहीत हेच खरे.नुकताच सापडलेल्या फोनवरून बाळ बोठे याने वकीलांशी संपर्क साधल्याचे तसेच एका महिलेच्या संपर्कात तो असल्याचे निष्पन्न झाले आहे.

बाळ बोठे सध्या  न्यायालयीन कोठडीत पारनेर येथील कारागृहात आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. तेव्हा तेथील दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे दोन मोबाइल सापडले होते. आरोपींनी हे मोबाइल पाईपमध्ये लपवून ठेवले होते. त्याच कोठडीत बोठे यालाही ठेवलेले आहे. आरोपींना हे मोबाइल जेवण पुरविणारे सुभाष लोंढे आणि प्रविण देशमुख यांनी पुरवले असल्याचे तपासात आढळून आले होते. त्यानुसार पारनेर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करताना हे मोबाइल कोणी कोणी वापरले, कोणा कोणाला त्यावरून संपर्क केला याची माहिती घेण्यात आली. त्यानुसार बोठे यानेही यातील एका मोबाइलचा वापर केल्याचे आढळून आले. यामुळे कारागृहात मोबाईल वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठे यालाही आरोपी केले जाणार आहे. बोठे याने कोणाला फोन केले, त्यातून काय संभाषण झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.

बाळ बोठे याने प्रसिद्ध केलेल्या हनी ट्रॅप हि मालिका आणि आता जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरण यातील साधर्म्य हा निव्वळ योगयोग नक्कीच नाही. किंबहुना रेखा जरे  हत्या प्रकरणाशीही त्याचा संबंध आहे कि काय अशी शंका वाव आहे. तरी या प्रकरणी पोलिसांनी साखोल तपास करून या प्रकरणांचा एकमेकांशी काही संबंध आहे का याची पडताळणी केली पहिजे. 

 बाळ बोठे याच्या  जप्त केलेल्या  मोबाईल  मध्ये जर काही गोष्टी सापडल्या असतील आणि जर  जखणगाव प्रकरणाशी त्याचे धागेदोरे जुळत असतील तर या प्रकरणाची व्याप्ती आणखीन वाढण्याची शक्यता निर्माण होते.हनीट्रॅप प्रकरणास बळी पडलेल्यांना पोलिसांनी स्वतः हुन गुन्हे दाखल करण्यासाठी उद्युक्त करायला हवे.या प्रकरणांचा जेव्हडा पारदर्शक तपास करता येईल तितका करणे आवश्यक आहे आणि तो तसा झाल्यास रेखा जरे हत्याकांडाशी याचा काही संबंध आहे काय ? ते स्पष्ट होईल. त्यातूनच रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणाला न्याय मिळू शकेल.   

Post a Comment

0 Comments