मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण रद्द करू नये

मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचे आरक्षण रद्द करू नये 

राजेंद्र वाघमारे : जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन 

वेब टीम नगर : मागासवर्गीयांचे  पदोन्नतीमधील  ३३ टक्के आरक्षण रद्द करणारा ०७ - मे -२०२१ रोजीचा शासन निर्णय तात्काळ  रद्द करून पदोन्नतीची रिक्त पदे भरण्यात यावी,अशी मागणी अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या मागासवार्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद समाज कल्याण समितीचे माजी सभापती राजेंद्र वाघमारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी  डॉ. राजेंद्र भोसले यांना  आली.

यावेळी अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते व ओ बी सी  व्ही जे एन टी चे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेश समन्वयक सर्वश्री  संजय भोसले,नामदेव चांदणे,शिवाजीराव जगताप,बंटी यादव, नगर शहर एस सी विभागाचे शहराध्यक्ष नाथाभाऊ आल्हाट, विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा सविता विधाते, कार्याध्यक्षा शोभा पातारे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा सचिव दीपक कदम, अनुसंघम शिंदे आदी सुरक्षित अंतर आणि शासनाच्या नियमांचे पालन करत उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने  पी आय शेख यांनी शिष्ट मंडळाकडून निवेदन स्वीकारले अनुसूचित जाती - जमाती , मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला गट ७ मे २०२१ रोजी शासनाने जी आर काढून स्थगिती दिली होती. ती स्थगिती उठवून पदोन्नती सुरु ठेवावी अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली. मागासवर्गीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे भरतांना सर्व संवर्गांना आरक्षण लागू करण्यात आले. मागासवर्गीयांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन वरील मागणी शासनाने मान्य करावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पक्षाच्या मागास वर्गीय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी १९ मेच्या  राज्यमंत्री मंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत वरील निर्णया प्रमाणे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याला अनुसरून पक्षाच्या एस सी  विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे आणि विभागाच्या सर्व जिल्हाध्यक्षांनी राज्यभर निवेदनाची मोहीम राबवून ना.राऊत व श्री अंभोरे यांना पाठिंबा दर्शविला त्यात नगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी कार्यालयात पदोन्नतीचा प्रश्न उपस्थित करून निवेदन दिले.

असेच निवेदन कास्ट्राईब  राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष शशिकांत वाकचौरे यानींही आज आक्रोश निवेदन म्हणून जिल्हाधिकार्यांना  दिले. त्याही शिष्टमंडळाचे निवेदन पी आय शेख यांनी स्वीकारले.


Post a Comment

0 Comments