बंदिस्त राम मन्दिर भक्तांसाठी खुलं करणं हि राजीव गांधी यांची सद्भावना कृती होती : भुजबळ

बंदिस्त राम मन्दिर भक्तांसाठी खुलं करणं  हि राजीव गांधी यांची सद्भावना कृती होती : भुजबळ 

वेब टीम नगर : संगणकीकरण ते पंचायत राज हे राजीव गांधी यांचे कार्य देशाला आधुनिकते कडे घेऊन जाणारे होते. तसे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताला मजबूत करतांना अयोध्येत टाळं लागलेलं विवादित राम मंदिर भक्तांसाठी त्यांनी खुलं केलं त्यांचं हे कार्यही द्वेषपूर्ण वातावरणात सद्भावना  निर्माण करणारे होते. असे प्रतिपादन अहमदनगर शहर काँग्रेसचे नेते बाळासाहेब भुजबळ यांनी केले. 

सुरक्षित अंतर ठेऊन  शासन नियमांचं पालन करून नगर शहर,भिंगार काँग्रेस आणि अल्पसंख्याक विभागाच्या वतीने भारतरत्न  राजीव गांधी यांची ३०वी पुण्यतिथी निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर,जेष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी, शहर सरचिटणीस अभिजित कांबळे, आदी उपस्थित होते. तर ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून  अन्य पदाधिकारी आपल्या घरी राहून त्यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला. जेष्ठ पदाधिकारी बाळासाहेब भंडारी, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, काँग्रेस सेवादल महिला जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस फिरोज खान, शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार, भिंगार महिलाध्यक्ष मार्गारेट जाधव, युवानेते शहर चिटणीस अज्जू शेख. आदी उपस्थित होते.या पदाधिकाऱ्यांनी राजीवजींच्या पक्ष नेतृत्व आणि पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याची महती यावेळी सांगितली. 

सभेच्या प्रारंभी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजीव सातव आणि पक्षाचे नगर जिल्हा उपाध्यक्ष प्रेमसुख लोढा यांच्यासह कोविड प्रादुर्भावाने निधन झालेल्यांना  या सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. 


Post a Comment

0 Comments