हनीट्रॅप मध्ये फसविणाऱ्या आरोपीना २० मी पर्यंत पोलीस कोठडी

हनीट्रॅप मध्ये फसविणाऱ्या आरोपीना २० मे पर्यंत पोलीस कोठडी 

वेब टीम नगर : शरीर संबंधाच्या आमिष दाखवून श्रीमंतांना जाळ्यात ओढून त्यांना हनीट्रॅप मध्ये फसवणारी जखणगाव येथील एका महिलेचा आणि तिच्या साथीदारांचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर या गुन्ह्याची आणखी व्यापकता वाढणार आहे . या महिलेने अनेकांना हनीट्रॅपमध्ये फसविल्याची जखणगाव परिसरात जोरदार चर्चा आहे.

पोलिसांनी जखणगाव येथून अटक केलेल्या महिलेला आणि तिच्या साथीदार अमोल सुरेश मोरे याला न्यायालयाने २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पाच ते सहा महिन्यापासून सदर महिला श्रीमंत लोकांना हेरून त्यांना शारीरिक संबंधचे आमिष दाखवून त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करत ब्लॅकमेल करत होती 

सदर महिलेने तिच्या साथीदाराच्या मदतीने अनेकांचे अशील व्हिडिओ चित्रीकरण करत त्यांच्याकडून मोठ्या रकमा वसूल केल्याची चर्चा परिसरात होत आहे. आता पोलिसांनाही त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे ज्याची अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे त्यांनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नवऱ्यापासून वेगळी राहणाऱ्या या तीस वर्ष महिलेने जखणगाव येथे आलिशान बंगला बांधला आहे. काही दिवसांपूर्वी तिने मोठा आणि व्यवसायिक असलेल्या व्यक्तीला आपल्या जाळ्यात ओढले . एप्रिल महिन्यात बंगल्यात बोलवून त्याला शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले आणि त्याचे व्हिडिओ काढून घेतले . तर एक कोटी रुपयाची खंडणी मागितली तसेच त्याच्याजवळ असलेल्या पैसे व दागिने लुटले.

 शेवटी तो व्यवसायिक नगर तालुका पोलिसाकडे गेला आणि संपूर्ण हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी सदर महिला व तिच्या साथीदार अमोल मोरे याला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments