रेमेडिसिवीर काळाबाजार प्रकरणी ४ जन अटकेत ; ११लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त

रेमेडिसिवीर काळाबाजार प्रकरणी ४ जन अटकेत ; ११लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त 

वेब टीम नगर : रेमडीसीविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या घटना राज्यभरात  सर्वत्र घडत आहे नगर मध्ये सुद्धा हा प्रकार पुन्हा एकदा उजेडात आला आहे, आज औरंगाबाद महामार्गावरील वडाळाबहिरोबा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री रॅकेटवर छापा टाकून चार जणांस अटक केली. या गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इंजेक्शन असा ११ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

रामहरी बाळासाहेब घोडेचोर, (वय २२) रा.देवसडे ता.नेवासा, आनंद पुंजाराम थोटे (वय२८) (रा.भातकुडगाव ता.शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (वय २९) (रा.देवटाकळी ता.शेवगाव) व सागर तुकाराम हंडे (वय ३०)(रा.खरवंडी ता.नेवासा) या चौघास अटक करण्यात आली असून एक आरोपी पसार झाला आहे.

करोना उपचारासाठी आवश्यक असलेले विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन वडाळाबहिरोबा येथे विकले जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना समजल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, कर्मचारी सुरेश माळी, संतोष लोंढे, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, रवींद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रकाश वाघ, योगेश सातपुते, उमाकांत गावडे व पथकाने पंचांसह छापा टाकून चार जणांस अटक केली आहे.

या अगोदर सुद्धा नगरमध्ये भिंगारे असा प्रकार घडलेला होता त्यावेळी कॅम्प पोलिसांनी कारवाई करून१५ इंजेक्शन हस्तगत केले होते इंजेक्शन जप्त झाल्या नंतर ते न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा रुग्णालयांमध्ये देण्यात आले होते नगर शहरामध्ये हा प्रकार त्यावेळेला उजेडात आल्यानंतर आता जिल्हाभर यामध्ये पोलिसांनी धडक कारवाई मोहीम पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर आज दुसरी कारवाई झाली आहे. 

पंचांनी संबंधित व्यक्तीस मोबाईलवर संपर्क करुन रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत विचारणा केली असता एका इंजेक्शनची किंमत 35 हजार रुपये सांगण्यात येवून वडाळा येथील हॉटेल समाधान समोर येण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पथकाने सापळा रचून चार जणास अटक केली. एक आरोपी पसार झाला.

आजच्या कारवाईत एक कार, एक मोटारसायकल, मोबाईल, रेमडेसिवीर इंजेक्शन असा ११ लाख ७० हजाराचा ऐवज जप्त केला आहे. शनिशिंगणापुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल अधिक तपास करत आहेत.

अन्न व औषध प्रशासनचे निरीक्षक अशोक तुकाराम राठोड यांच्या फिर्यादीवरुन कोवीड १९ साथ आजारचा फायदा घेण्याच्या उद्देशाने औषध किंमत नियंत्रण आदेश नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Post a Comment

0 Comments