संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला 

वेब टीम संगमनेर : संगमनेर शहरात पेट्रोलिंग करताना दिल्लीनाका परिसरातील मोगलपुरा परिसरात काही नागरिक जमाव करून उभे असताना पोलिसांनी त्यांना कोविड अंतर्गत शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे समजावून सांगितले असता, तेथील जमावाने एकत्र येत पोलिसांना शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करत दगडफेक करून दहशद पसरविण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी सहा आरोपींसह इतर १५ अनोळखी नागरिकांवर शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यापासून ते साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लखमीपूरा परिसरात मोठी गर्दी झाली होती. यावेळी गस्तीवर असलेल्या नगर येथील राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी त्याठिकाणी पोहोचली.

यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या बहुतेक कोणत्याही नागरिकाने मास्क घातलेला नव्हता आणि त्यांच्याकडून सामाजिक अंतर नावाच्या नियमांची उघड पायमल्ली सुरु होती. त्यामुळे गस्ती पथकातील राज्य राखीव दलाच्या जवानांंनी तेथे जमलेली गर्दी हटवण्याचे प्रयत्न करत त्यांना समजावून सांगितले. यावेळी जमावातील काही माथेफिरुंनी तिनबत्ती चौकातील लिंबाच्या झाडाखाली निवाऱ्यासाठी पोलिसांनी ठोकलेला तंबुही उखडून रस्त्यावर फेकून दिला. 

यावेळी तीन बत्ती चौकात सुमारे शंभर ते दिडशे जणांचा मोठा जमाव जमला होता. जमलेल्या जमावानेच पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली. त्यावेळी नाईलाजाने पोलिसांना त्याठिकानाहून पलायन करत असताना जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली, यात काही खाजगी वाहनांचेही नुकसान झाले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सलमान शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी जुबेर हॉटेलचा चालक, तेथील सर्व कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हनीफ रशीद शेख, अरबाज शेख या निष्पन्न आरोपींसह अन्य दहा ते पंधरा जणांवर दंगलीच्या कलमांसह गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर निष्पन्न आरोपींसह अन्य बहुतेकजण पसार झाले आहेत.

Post a Comment

0 Comments