नियोजना अभावी लसीकरणाचे तीनतेरा
मनपा कर्मचारी आणि लास घेणाऱ्यांची उडाली त्रेधा
वेब टीम नगर : वारंवार बदलल्या जाणाऱ्या लसीकरणाच्या नियोजना अभावी लसीकरणाचे तीनतेरा वाजल्याचे दृश्य आज नगर शहरात पाहायला मिळाले. एरवी देखील लसीकरण केंद्रावर पहाटे पासून रांगा लावणाऱ्या वक्तींना लसी अभावी परतावे लागत असल्याचा अनुभव गेले २-३ दिवसांपासून येत होता.मात्र लास उपलब्ध असतांनाही लस घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींची या केंद्रावरून त्या केंद्रावर धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
शहरातील माळीवाडा येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात असलेले लसीकरण केंद्र, बुरूडगाव येथील जिजामाता उद्यान, आर्युर्वेद रग्णालयातील लसीकरण केंद्र तसेच तोफखान्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्र आदी. केंद्रांवरच ४५ - ६० व त्यापुढील वयोगटासाठी लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची सोया करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच या वयोगटातील नागरिकांनी या केंद्रांवर गर्दी केली मात्र आयुर्वेद लसीकरण केंद्रात लसीकारणासाठी टोकन वाटपही
करण्यात आले. या लसीकारण केंद्रावर आज कोवॅक्सीन हि लस असल्याचे सांगण्यात आल्याने कोविशील्डचा दुसराडोस घेण्यसाठी आलेल्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागले मात्र प्रत्येक्षात लस घेतांना कोविशील्डची लस आल्याचे सांगण्यात आले. तेथे लसीकरण सुरु होणार इतक्यात लसीकरणाचे नियोजन बदलल्याने फक्त १८-४४ या वयो गटातील व्यक्तींनाच लास देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आले. हीच परिस्थिती माळीवाडा येथील लसीकरण केंद्राचीही होती तर जिजामाता उद्यान आणि तोफखाना येथीलओ लसीकरण केंद्रांवर ४५-६० व त्यावरील वयोगटासाठी उशीरा डोस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या बदलेल्या नियोजनामुळे लस घेण्यासाठी आलेक्या व्यक्तींची चांगलीच त्रेधा उडाली.शिवाय उपलब्ध झालेल्या लसींची संख्या मर्यादित असल्याने अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागले.
१८-४५ या वयोगटातील व्यक्तिंना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागते त्यामुळे ऑनलाईन नोंदणी कराताना या व्यक्तींना त्यांच्या जवळचे केंद्र व लसीकरणाची वेळ सांगितली जाते. त्यावेळेत ती व्यक्ती तेथे पोहोचल्यानंतर तिचे लशीकरां केले जाते मात्र आज नोंदनीं कृत व्यक्ती आणि उपलब्ध लसी यांचे प्रमाण व्यस्थ झाल्याने आयुर्वेद , माळीवाडा , आणि जिजामाता या लसीकरण केंद्रांवर तरुणाईच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. तर तोफखाना आणि सावेडी येथील केंद्रांवर ४५ पुढील व्यक्तींसाठी दुसरे डोस देण्यात आले. मात्र तेथेही लसीकरणासाठी आलेल्या व्याकस्ती आणि लसींचे प्रमाण व्यस्थ झाल्याने अनेकांना हात हलवत परतावे लागले.
काही भागात मात्र नगरसेवकांनी एक गठ्ठा लसीकरण करण्याचा चंग बांधल्याने या केंद्रांवरही गोंधळ उडाला होता. तर काही ठिकाणी मनपा कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप काही पदाधिकाऱ्यांनी केला तर काही ठिकाणी स्थानिक नेंत्यांच्या कार्यकत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांशी अरेरावी करण्याच्या घटना घडल्या.
लसीसाठी नगरमध्ये रस्ता रोको
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण नगर शहरात सलग तिसऱ्या दिवशी फसले. अहमदनगर महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रावर सलग तिसऱ्या दिवशीही नागरिकांना लस मिळाली नाही. त्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. त्यानंतरही लस उपलब्ध न झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत लस मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भावना येथे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले होते. पोलिसांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामध्ये बराच वेळ चालला गेला. यातूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचा फज्जा उडाला. सुरक्षित अंतराच्या नियमाचे उल्लंघन या आंदोलनामुळे झाले.
0 Comments