जनता कर्फ्यु पाळा हेच जर वारंवार सांगायचे असेल तर पुन्हा येऊ नका
कोरोना आजारांवर उपाययोजना करता आल्या नाही तर यापुढे पालकमंत्र्यांना अहमदनगर जिल्ह्यात येऊ देणार नाही..... नितीन भुतारे
वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. त्यात प्रशासन कुठलीही उपाययोजना करतांना दिसत नाही फक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ आल्यानंतर कडक लॉकडाऊन करा जनता कर्फ्यु पाळा असे आदेश प्रशासनाला देतात. अणि निघून जातात लॉकडाऊन या शब्दाची सर्वत्र मजाक होताना दिसत आहे. ईतर देशांमध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा येत होत्या त्या वेळेस हे सरकार झोपले होते का? आज २००० लोक मेल्यानंतर पालकमंत्र्यांना ऑक्सीजन प्लांट सुरू करण्याची उपरती होत आहे. जंबो कोविड सूरू करण्याची उपराती होत आहे. हा प्रकार म्हणजे पालकमंत्री स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रकार करतांना दिसत आहे. आज प्रशासनामुळे कोरोना वाढतांना दिसत आहे कोरोना आजारावरील मृत्यूमुखी पडलेल्या लोकांचे अंत्यविधीला नागरिकांची गर्दी होत आहे. सरकारी खाजगी हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांच्या जवळ नातेवाईक जात आहेत या सर्व प्रकारामुळे कोरोना रुग्ण वाढत आहे. दुसरी कडे प्रशासन या कडे लक्ष्य देत नाही त्यामुळे कोरोनाची अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
रुग्णांना ऑक्सीजन , बेड, टेस्टिंग किट, लसीकरण कसे ताबडतोप होइल मिळेल या वर पालकमंत्र्यांनी एक महिना अगोदर उपाययोजना करणे गरजेच असतांना आज तहान लागल्यावर विहीर खांदताना पालकमंत्री दिसतं आहेत राष्ट्रीय लसीकरणमोहीम हि ४५ वयांच्या पुढील लोकांची चालु असून त्या मध्येच १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरणमोहीम राबविण्यात येत आहे खरं तर हि राज्याची मोहीम आहे ती दुसऱ्या ठिकाणीं राबविणे गरजेच आहे. आधीच ज्येष्ठ नागरिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन ला लसीकरणाच्या ठिकाणी केंद्रावर उभे राहतात. त्या मध्ये अजुन हि गर्दी म्हटल्यावर कोरोना वाढणारच त्यात त्याच ठिकाणी कोणाच्या रुग्णांचे टेस्टिंग या सर्व गोष्टी वर उपाययोजना करायचे सोडुन लॉकडाऊन पाळा एवढा बोलायचं आणि निघून जायचे.
रेशन दुकानांवर रेशन दुकानदार नागरिकांना धान्य कमी देत आहेत. हे पाहणे गरजेचे आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने तील खाजगी हॉस्पिटल गोरगरिब रुग्णांचे उपचार करत नाही ते उपचार होणे गरजेचे आहे. रेमडीसिविर इंजेक्शन अजूनही कोरोना रूग्णांना मिळत नाही हे अश्या प्रकारच्या समस्या मधून अहमदनगर ची जनता जात आहे या येणाऱ्या लोकांना अडचणीतून बाहेर काढणे गरजेच आहे.
लोकांचे पूर्वपदावर आणण्यासाठी नियोजन करणे गरजेचे असताना अहमदनगर ला आल्यावर मुंबईच्या प्रश्नावर माध्यमांशी बोलता , आणि कडक लॉकडाऊन, जनता कर्फ्यु नागरिकांनी पळाला पाहिजे असे आदेश प्रशासन व नागरिकांना देऊन जाता कडक लॉक डाऊन, जनता कर्फ्यु या या वाक्याची राज्यभर मजाक सूरू आहे. त्यामुळे आपल्याला जर अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना आजाराची परिस्थिती हाताळता येत नसेल तर कायम आल्यावर अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ जर जिल्हयातील नागरिकांना लॉक डाऊन, जनता कर्फ्यु पाळा हेच सांगणार असतील तर पुन्हा अहमदनगर जिल्ह्यात येऊ नका काम करायचे असेल तर तुम्हाला आम्ही पालकमंत्री म्हणून स्वीकारू अन्यथा येणाऱ्या काळात तूम्ही जर कोरोना आजारांवर उपयोजना राबविल्या नाही तर या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालकमंत्र्यांना अहमदनगर जिल्ह्यात येऊ देणार नाही असा ईशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे. याची नोंद पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घ्यावी अशी विनंती देखील नितीन भुतारे यांनी केली आहे.
0 Comments