नगर मधील खाजगी रुग्णालयात सात कोरोना बाधितांचा मृत्यू

नगर मधील खाजगी रुग्णालयात सात कोरोना बाधितांचा मृत्यू 

मृत्यूचे कारण मात्र गुलदस्त्यात 

 वेब टीम नगर: नगर मधील एक खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन अभावी सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र या रुग्णालयाला भेट दिली असता तेथील डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे मान्य केलं,मात्र हे मृत्यू ऑक्सिजन च्या तुटवड्याने झाले नसल्याचे म्हंटले आहे तर.हे मृत्यू  रुग्णांना असलेल्या विविध आजारांनी झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मात्र मृतांची नावे सांगण्यास टाळाटाळ केली. तसेच डॉक्टरांच्या संघटनेची बैठक सुरू असुन या बाबतचा अधिक तपशील संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन देण्यात येणार असल्याची माहिती या डॉक्टरांनी दिली. 

दरम्यान हॉस्पिटलमधील सिलेंडर मध्ये ऑक्सिजन होता मात्र तो पुरविण्यात येणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची चर्चा रुग्णालयाच्या आवारात होती.त्यामुळे ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे की आधी पासून व्याधीग्रस्त असलेल्या आजारांनी हे मृत्यू झाले या बाबत संभ्रम निर्माण झाला आहे त्याबाबत चा खुलासा सायंकाळच्या पत्रकार परिषदे नंतरच होणार आहे.

Post a Comment

0 Comments